रायगड लोकधारा वृत्त :
कळंबोली वार्ताहर – अविनाश जाधव : नवी मुंबई येथील कळंबोली येथील विद्यार्थ्याने महाविद्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
आत्महत्याच कारण काय..?
कळंबोली येथे राहत असलेला कुणाल पोपट जाधव (वय वर्ष 20, हंसध्वनी गृहसंकुल सोसायटी कळंबोली) येथे राहत असलेल्या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. हा मुलगा मायग्रेन च्या आजाराने त्रस्त झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती कळंबोली पोलीस ठाण्याकडून देण्यात आली.
कॉलेजमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचा टोकाचा निर्णय याबाबत सविस्तर वृत्त असे की कुणाल जाधव हा कळंबोलीतील हंसराज गृहसंकुल सोसायटीमध्ये आपल्या कुटुंबासह राहत होता. कुणाल चे वडील पोपट जाधव हे मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत असणाऱ्या गोवंडी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. कुणाल नेरूळ मधील तेरणा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये तिसरा वर्षात शिकत होता मागील काही दिवसापासून त्याला मायग्रेनचा त्रास होत होता. सतत मायग्रेनच्या त्रासा मुळे तो नेहमी असं होत होता. माय त्याच्या मनात सतत आत्महत्येचा विचार येत असल्याचे त्याचे वडिलांनी सांगितलं मात्र प्रत्येक वेळी त्याच्या वडिलांनी आपल्या लेखाची कुणालची याबाबत समजूत काढली होती. या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास सुमारास सुरक्षारक्षकाकडे कुणाल ने मागणी केली होती. सुरक्षारक्षकाने मात्र याला नकार दिला होता. काही वेळेनंतर सुरक्षारक्षक गच्ची वरती पाणी सोडण्यासाठी म्हणून गेला असताना सुरक्षारक्षकाचे नजर चुकवून कुणाल गच्ची वरती गेला आणि गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कळंबोली पोलिसांनी या प्रकरणाच्या कसमत प्रक्रियेची नोंद करून पुढील तपास सुरुवात केली आहे.
