रायगड लोकधारा वृत्त :
ठाणे-समाजात कार्य करत असताना अनेक अडचणी येत असतात. तरीही समाजकार्याची ओढ असल्याकारणाने सर्वांच्या सहकार्याने काम करण्यास बळ मिळते. जनजागृती सेवा संस्थेने गेल्या चार वर्षात शैक्षणिक, सांस्कृतिक, वैद्यकीय सेवा, पत्रकारिता, सामाजिक अशा विविध क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी केलेली आहे. जनजागृती सेवा संस्थेच्या या कार्याची दखल इंडियन काॅपीराईट प्रोटेक्शन,आपली मुंबई न्युज चॅनल, निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट, दक्ष नागरिक पोलिस मित्र महाराष्ट्र राज्य या संस्थांनी घेतली. या संस्थांनी संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांना’ महाराष्ट्र अभिमान’ पुरस्कार मुंबईचे सेवानिवृत्त डी. सी. पी. सीताराम न्यायनिर्गुणे व अॅन्टीपायरसी सेल मुंबई चे तपाशी अधिकारी रामजित (जीतु) गुप्ता यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर कर्नल रविंद्रजी त्रिपाठी, मिसेस स्टार महाराष्ट्र विजेता प्राची जैन, अभिनेत्री साक्षी नाईक, एम. एम. आर. डी. एचे सिव्हील इंजिनिअर दिगंबर तायडे, ज्योती सनये, वैद्यकीय मदत कक्षाचे न्यायिक सल्लागार धनाजी पवार, महिला उद्योजक कामिनी भोसले, दक्ष नागरिक पोलिस मित्र महाराष्ट्राचे संस्थापक-अध्यक्ष राजेश भोसले, डाॅ. अनिता गुप्ता, बिल्डर आणि उद्योगपती अशोक जैन, आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम ए. सी. क्लब हाऊस, लोढा आमरा, कोलशेत, ठाणे पश्चिम येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी शिक्षण, कला, क्रीडा, आरोग्य, साहित्य, पत्रकारिता, शासकीय अधिकारी, सांस्कृतिक, सामाजिक, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तींना पुरस्कार प्रदान करुन गौरविण्यात आले. जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर यांना “महाराष्ट्र अभिमान” पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अॅन्टीपायरसी सेल मुंबई चे तपाशी अधिकारी रामजित गुप्ता सर, आपली मुंबई लाईव्ह न्युज चॅनलच्या संचालिका चंदन पाटील, निर्मलरत्न चॅरिटेबल ट्रस्ट च्या अध्यक्षा सुलक्षणा कांबळे, दक्ष नागरीक पोलिस मित्र महाराष्ट्र राज्य कल्याण शहर अध्यक्षा गायत्री पांडे व त्यांच्या सर्व टीमने विशेष परिश्रम घेतले.
