रायगड लोकधारा वृत्त :
उरण प्रतिनिधी – विठ्ठल ममताबादे : उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते महादेव कृष्णा पाटील (वय ७९) यांचे शुक्रवारी अल्पशा आजाराने निधन झाले. उरण पूर्व विभागातील सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक कार्यात त्यांचा हिरीरीने सहभाग होता. ते पत्रकार नीलेश पाटील आणि महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार सन्मानित शिक्षक मनोज पाटील व महेंद्र पाटील यांचे ते पिताश्री होत.
महादेव पाटील यांचा दशक्रिया विधी सोमवार २८ एप्रिलला ला माणकेश्वर, तर उत्तरक्रिया २९ एप्रिल ला पाणदिवे, उरण येथे होणार आहे. उरण तालुक्यातील पाणदिवे गावातील सामाजिक कार्यकर्ते महादेव कृष्णा पाटील (७९) यांचे एम जीएम हॉस्पिटल कामोठे येथे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने कुटुंबायांवर मोठ्या प्रमाणात शोककळा पसरली आहे.तर माणुसकीचे नाते जपणारे व्यक्तिमत्व हरपल्याचे दुःख कोप्रोली विभागात निर्माण झाले आहे.
उरण पूर्व विभागातील सामाजिक व धार्मिक कार्यात तसेच शेतकरी लढ्यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या अंत्य यात्रेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह नातेवाईक, मित्रमंडळींनी त्यांच्या पाणदिवे येथील निवासस्थानी व स्मशान भूमीवर गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, तीन विवाहित मुलगे, सुना, नातवंडे असा मोठा त्यांचा परिवार आहे.
