रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : गोदरेज फंड मॅनेजमेंटने व्हेवज समिट २०२५ मध्ये महाराष्ट्र शासनासोबत एक सामंजस्य करार केला. या धोरणात्मक भागीदारीचा उद्देश जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञान, सुरक्षितता आणि शाश्वततेच्या मानकांनुसार अत्याधुनिक चित्रपट आणि मीडियाकॅम्पस विकसीत करून महाराष्ट्रात कला, माध्यम आणि दूरचित्रवाणी क्षेत्राच्या वाढीस चालना देणे हा आहे. या सामंजस्य कराराअंतर्गत, महाराष्ट्र शासन गोदरेज फंड मॅनेजमेंट अॅण्डइन्व्हेस्टमेंटअॅडव्हायझर्स प्रायव्हेट लिमिटेडला कॅम्पसविकासासाठी राज्य शासनाच्या विद्यमान धोरणे, नियम आणि कायद्यांनुसारसंबंधित राज्य विभागांकडून आवश्यक परवानग्या, नोंदणी, मान्यता आणि वित्तीय सवलती मिळवण्यासाठी सहाय्य करेल. गोदरेज सिटी, पनवेल या एकात्मिक गोल्फ टाउनशिपमध्ये असलेल्या या कॅम्पसमध्ये स्टुडिओज असतील.
अत्याधुनिक सोयीसुविधा व जागतिक दर्जाच्या निर्मिती सुविधा पुरवत हे कलाकार, संगीतकार आणि चित्रपट निर्मात्यांसाठीमहत्वाचेकेंद्र ठरेल. या केंद्राच्या डिझाइनसाठी आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची नियुक्ती करण्यात आली असून ते नवीनतम तंत्रज्ञान, AI यांसारख्या प्रणालींनी सुसज्जआहे. कुशल मनुष्यबळासह जगातील सर्वात मोठा आशय निर्मिती देश म्हणून भारताला या स्टुडिओद्वारे स्थानिक प्रतिभेचा उपयोग करून कथाकथनातीलउत्कृष्टतेकडे वाटचाल करता येईल.या सुविधेमुळे आशय निर्मिती, हॉस्पिटॅलिटी आणि तांत्रिक सेवा क्षेत्रांमध्ये रोजगारनिर्मिती होऊन लक्षणीय आर्थिक प्रभाव निर्माण होण्याची अपेक्षा आहे. तसेच पर्यटन आणि परकीय चलन यांना चालना मिळेल. यामुळे भारत सरकारच्या परदेशी चित्रपट निर्मितीसाठीच्या प्रागतिक प्रोत्साहन धोरणाचा लाभ घेता येईल.
या विकासामुळे पूरक उद्योगांनाही चालना मिळेल आणि पनवेल हे सर्जनशील उद्योजकता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी एक सक्षम केंद्र म्हणून उदयास येईल. हे विकासकार्य मुंबई ३.० या पुढारलेल्या नागरीकरण आणि शाश्वत विकासाच्या दृष्टिकोनाशी पूर्णपणे सुसंगत आहे आणि राज्यभर आर्थिक विकासाला गती देण्याच्या दिशेने आहे. गोदरेज फंड मॅनेजमेंटचेव्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी करण बोलारिया म्हणाले, “हा उपक्रम म्हणजे नवकल्पना, सर्जनशीलता आणि रोजगारास चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनासोबतची एक अर्थपूर्ण भागीदारी आहे. मुंबई ३.० च्या दृष्टीकोनाशी सुसंगत जागतिक प्रतिभेला आकर्षित करणारी, स्थानिक सर्जनशील लोकांना सक्षम करणारी आणि पनवेलला सांस्कृतिक आणि व्यावसायिक केंद्र बनवणारीएक गतिशील परिसंस्था उभारण्याचा आमचा उद्देश आहे.”
गोदरेज सिटी, पनवेल ही १४५ एकरमध्ये पसरलेली एक स्वयंपुरकगोल्फटाउनशिपअसून तिथे ३० एकरच्या९-होलगोल्फकोर्सचा समावेश आहे. या विकास प्रकल्पात नामांकित शाळा, आरोग्य सेवा, व्यावसायिक क्षेत्र आणि लोकप्रिय खाद्यपदार्थांच्या आउटलेट्सचा समावेश आहे. ही जागा दळणवळणाच्या सोई सुविधा यांच्या अनुषंगाने अत्यंत अनुकूल असून आगामी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि मुंबई-पुणे एक्सप्रेसवेपासून केवळ काही मिनिटांच्या अंतरावर आहे. अटलसेतू (मुंबई ट्रान्स हार्बर लिंक) यामुळे दक्षिण मुंबईपर्यंतचा प्रवासाचा कालावधी आणखी कमी होतो. निसर्गसौंदर्य आणि शहरी पायाभूत सुविधांचा परिपूर्ण संगम असल्याने ही जागा चित्रपट, संगीत व्हिडिओ आणि विविध व्यावसायिक निर्मितींसाठी आदर्श स्थळ आहे.
चौकट – जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. तर पनवेल येथे चित्रपट सृष्टी उभारण्यात येणार असून यासाठी गोदरेज सोबतही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
