रायगड लोकधारा वृत्त :
विजय चंद्रकांत गायकर – पनवेल : शेकाप आणि महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या जे. एम. म्हात्रे यांनी अखेर कार्यकर्त्यांकडून आलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करत भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे. सात मे रोजी उलवे नोड येथे स्व. जनार्दन भगत यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमात ते आपल्या समर्थकांसह माजी मंत्री आणि प्रदेश कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार आहेत. त्यापूर्वी त्यांनी लोकनेते मा. खा. रामशेठ ठाकूर यांच्या निवासस्थानी जावून भेट घेतली. त्यांच्याकडून हिरवा कंदील मिळाल्यावर म्हात्रे 7 मे रोजी पक्ष प्रवेश करत आहेत. दरम्यान त्यांच्यासोबत महानगरपालिकेतील काही माज नगरसेवक, उरण मतदारसंघातील काही पदाधिकारी आणि हजारो कार्यकर्ते भाजपात प्रवेश करणार आहेत.
कोण कोण असतील सोबत ?
1) प्रितम म्हात्रे, माजी विरोधी पक्ष नेते पमपा
2) गणेश कडू, जिल्हा चिटणीस पनवेलमहानगर व माजी नगरसेवक
3) प्रिती जॉर्ज, माजी नगरसेविका
4) अनुराधा ठोकळ, माजी नगराध्यक्षा
5) सुरेखा मोहोकर, माजी नगरसेविका
6) सारीका भगत, माजी नगरसेविका
7) रविंद्र भगत, माजी नगरसेवक
8) किरण दाभणे, माजी नगरसेवक
9) गणेश पाटील, माजी उपनगराध्यक्ष
10) जीवन म्हात्रे
11) रामेश्वर आंग्रे, माजी सरपंच करंजाडे
12) जगदीश पवार, माजी पंचायत समितीसदस्य आणि अन्य काही महत्वाचे पदाधिकारी व कार्यकर्ते.
