रायगड लोकधारा वृत्त :
रायगड प्रतिनिधी :
शिवसेनेच्या विरोधात जी काय ताकद दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत चुकीचे वागताय त्यांना आपली सुद्धा ताकद दाखवता येईल :- नामदार गोगावले यांचा नाव न घेता तटकरेंना टोळा…. / जे प्रवेश करते एकनाथ शिंदे साहेबांच्या वरती विश्वास ठेवून आले आहेत त्या विश्वासाला कुठेही तडा दिला जाऊ देणार नाही नामदार भरतशेठ गोगावले… / आम्ही ज्यावेळी निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळी ठाकरे गटाची जबाबदारी होती ती कुठेही पार पाडली नाही. / म्हणून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी त्यांची साथ सोडून आमच्याबरोबर आले : अनिल नवगणे…
रायगड प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यात रोजगार हमी योजना फलोत्पादन, आणि खार भूमी विकास मंत्री नामदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन टायगर सुरू आहे, काहीच दिवसांपूर्वी नामदार गोगावले यांच्याजवळ दोन हात केलेल्या ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांना राष्ट्रवादीमध्ये प्रवेश देत मंत्री भरतशेठ गोगावले यांना खासदार सुनील तटकरे यांनी शह देण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रवेश होतो ना होतो तोच पूर्वीच्या ठाकरे गटाचे जिल्हा, आणि निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून विधानसभेची निवडणूक लढवलेले अनिल नवघणे यांचा शिवसेनेत प्रवेश करून घेत राष्ट्रवादीला शह देण्याचे काम नामदार गोगावले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मात्र आता इंदापूर, तला या विभागातील उबाटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते अनिल नवघणे यांच्या पुढाकाराने पुन्हा एकदा मूल शिवसेनेत दाखल होत आहेत त्यामुळे शिवसेनेमार्फत सुरू असलेले ऑपरेशन टायगर हे आता रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत आहे. आज इंदापूर आणि तला विभागातील पट्ट्यातील असंख्य उबाटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पुन्हा प्रवेश केला त्यांचा आम्ही स्वागत करतो, त्यांनी जो शिंदे साहेबांवर विश्वास दाखवलाय त्याला कुठेही तडा दिला जाऊ देणार नाही असा विश्वास नामदार भरत शेठ गोगावले प्रवेश करताना दिला आहे, तर आम्ही ज्यावेळी निवडणुकीला सामोरे गेलो त्यावेळी उबाटाने त्यांची ची जबाबदारी होती ती पार पाडली नाही म्हणून आज ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना पक्षात दाखल होत आहेत असे अनिल नवघणे यांनी सांगितले आहे. या पक्षप्रवेश नामदार भरत शेठ गोगावले, शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख अरुण चालके, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख प्रमोद घोसालकर, उपजिल्हाप्रमुख रमेश मोरे, अनिल नवघणे इत्यादी उपस्थित होते.

