आम्ही पनवेलकर वृत्त :
बदलापूर प्रतिनिधी – गुरुनाथ तिरपणकर : प्रेरणा फाउंडेशन रजि. 564 / एफ 38784 / बदलापूर /ठाणे/महाराष्ट्र या सामाजिक संस्थेचा 4 मे 2025 रविवार रोजी प्रेरणा फाउंडेशन 7 वा वर्धापन दिन सोहळा सकाळी 10 ते दुपारी 3 वाजता सत्कर्म बालकाश्रम, बदलापूर येथे मोफत आरोग्य शिबीर व पुरस्कार वितरण करून 7 वा वर्धापन दिन धुमधडाक्यात साजरा झाला. मोफत आरोग्य तपासणी तसेच पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन प्रेरणा फाउंडेशनच्या संस्थापिका/अध्यक्षा सौ. प्रेरणा वैभव कुलकर्णी यांनी केले, यांना बहुमोलाचे सहकार्य सन्माननीय व मा. रामजीत गुप्ता सर, फिजिओथेरपीस्ट डॉ. पारुल लाड महेंद्रू ( मोलाचा ) वाटा व मा. डॉ. राहत शेख यांनी केले. या कार्यक्रमाला फाउंडेशन चे सचिव वैभव कुलकर्णी, खजिनदार कु. रोहन गावकर, मा. अविनाश म्हात्रे श्री. मंगेश सावंत यांचे विशेष सहकार्य लाभले. व तसेच या सोहळयाला सामाजिक, काम करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. प्रेरणा फाउंडेशन हे एक सामाजिक संस्था असून प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे. प्रेरणा फाऊंडेशन गेले सहा वर्ष सतत गोर गरीब लोकांना, रस्त्यावरील भटकी लोकांना, अनाथांना आधार देण्याचे काम करते. अनेक आदिवासी पाडे सुधारणे, आदिवासी गावाला रस्ता, वीज, पाणी व लाईट याची सोय, नदया, चौपाटी, एस टी डेपो, रेल्वे स्टेशन, रस्ते, ठिकठिकाणी स्वछता अभियान राबविणे, अनेक अनाथालय, वृद्धाश्रम, अनाथ रस्त्यावरील भटकी मुले यांना सहारा व सहकार्य देण्याचे काम करते. व तसेच प्रेरणा रंगमंच नाट्यमंडळ व प्रेरणा इन्स्टिटयूट अंतर्गत येणारे उपन्न सौ. प्रेरणा वैभव कुलकर्णी ह्या प्कॅन्सरग्रस्त, किडनीग्रस्त ई. मतिमंद निराधार लोकांना आधार देण्यासाठी वापरतात.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे मुख्य तपासी अधिकारी मा. श्री. रामजीत ( जीतू ) गुप्ता, बृह मुंबई होमगार्ड विभाग मा. श्री. दिलीप नारकर, वैद्यकीय तपासणी सहायक अधिकारी धनंजय पवार. अध्यक्ष दीनदयाल कुष्ठरोग संस्था, अध्यक्ष मा. श्री. अविनाश म्हात्रे ,( मुंबई आकाशवाणी केंद्राचे माजी गायक, जितेंद्रि अभिषेकी यांचे शिष्य, प्रसिद्ध गायक), मा. श्री. रघुनाथ फडके, मा. सौ. श्रुती आठल्ये, समाजसेवक, पत्रकार मा. श्री. राम घरत, फिजिओ थेरपिस्ट मा. डॉ. पारुल लाड महेंद्रू, मा. सौं. राजकुमारी गुप्ता मा. डॉ. राहत शेख, मा. पी. एस. कदम उपस्थित होते प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका सौ. प्रेरणा कुलकर्णी व सर्व अतिथीच्या हस्ते पुरस्कार सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला जनजागृती सेवासमिती अध्यक्ष मा. श्री. गुरुनाथ तिरपणकर व सत्कर्म आश्रम चे अध्यक्ष नामदेव पेशने व सचिव मकरंद वढवेकर व आश्रम कमिटी यांची उपस्थिती होती सौ. प्रेरणा वैभव कुलकर्णी व श्री. वैभव कुलकर्णी यांनी सूत्र संचालन निभावले. मा. राजकुमारी गुप्ता मॅडम, शैलेश सणस सर, मा. हर्षल सर, उर्मिला ताई, मा सहदेव पाटकर, युवा समाजसेवक मा राम घरत सर, अण्विक्षा कोडापे मॅडम, वंदना ठाकूर मॅडम, मा. संध्या कासारे समाजसेविका, मा ज्योती वाघ ताई समाजसेविका, मा. मिलिंद व मिताली आंबेरकर, मा. रोहित महाले, मा. राजेश भांगे, मा रंजना परब, तसेच मा. संतोषी बांगर, राजश्री सोनावणे यांनी मुलांना वस्तू खाऊ स्वरूपात भेट देऊन मुलांना सहकार्य केले तर अनेक समाजसेवकांनी 500 रुपये प्रमाणे ऐकून 6 लोकांनी रक्कम स्वरूपात आश्रममधील मुलांना प्रेरणा फाउंडेशन महाराष्ट्र अंतर्गत संस्थापिका सौ. प्रेरणा कुलकर्णी यांनी आपल्या नाट्यमंडळातून तुन 10000 रुपयाचा चेक सत्कर्म बालका श्रमास देऊन मदत केली. तसेच त्यांनी सादर केलेल्या कलेला विविध बक्षिसे दिली. या कार्यक्रमात मा प्रसिद्ध लेखिका सौं. बाविस्कर मॅडम यांचा पुस्तकं प्रकाशन सोहळा ही पार पडला.
या कार्यक्रमाला कु. रोहन गावकर मा. श्री. मंगेश सावंत, सदस्य सौ. गंधाली तिरपणकर, मा. ज्योती वाघ यांचे सहकार्य लाभले. प्रेरणा फाउंडेशन संस्थापिका. सौ प्रेरणा कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार मानले. मा.श्री. रामजीत गुप्ता सरांनी अन्नदानाचा आश्रमातील मुलांसोबत सर्वांनी सुंदर स्वादिस्ट भोजनाचा जवळजवळ 200 हुन अधिक लोकांनी जेवणाचा आस्वाद घेतला व कार्यक्रमाची सांगता झाली.

