रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरने हिरानंदानी कम्युनिटीज अँड क्रिसला डेव्हलपर्ससोबत प्रोप्रायटरी सीडीडीएमओ मॉडेलसाठी हातमिळवणी केली आहे. तब्बल ११०० कोटी रुपये उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असलेली रेसकोर्स थीम्ड मेगा टाऊनशिप उभारण्यासाठी ही भागीदारी करण्यात आली आहे. महत्त्वाचे म्हणजे भारतीय स्थावर मालमत्ता उद्योगक्षेत्रात हे पाऊल पहिल्यांदाच उचलले गेले आहे. विशिष्ट संकल्पनेवर आधारित, हॉस्पिटॅलिटी-चलित मॉडेलने स्थावर मालमत्ता क्षेत्रात एक नवीन गुंतवणूक वर्ग खुला आहे, ज्यामध्ये गुंतवणुकीवर ९टक्के पर्यंत परतावा देण्याची क्षमता आहे. या मॉडेलमुळे हा मूल्य प्रस्ताव स्थावर मालमत्तेच्या पलीकडे जाऊन, एक खास निवडण्यात आलेली लाईफस्टाईल इकोसिस्टिम निर्माण करतो, ज्यामध्ये अतुलनीय लक्झरी, कम्युनिटी आणि अनुभवात्मक हॉस्पिटॅलिटी यांचा मिलाप आहे.
पुण्यातील वेगाने विकसित होत असलेल्या उत्तर हिंजवडीमध्ये तब्बल ४० एकरांहून मोठ्या परिसरात वसवण्यात येणार असलेल्या या टाऊनशिपमध्ये ८ एकरांचे रेसकोर्स आणि इंटरनॅशनल पोलो क्लब, १२८ खाजगी व्हिला प्लॉट्स, ११२ रिसॉर्ट खाजगी निवास, ३०० खोल्यांचे पंचतारांकित लक्झरी रिसॉर्ट, ९ वेडिंग डेस्टिनेशन व्हेन्यू, १२ कॉर्पोरेट आणि माईस व्हेन्यू, एक्स्ट्रीम ऍडव्हेंचर पार्क, डेला रेन्ज गोल्फ, वेलनेस सुविधा आणि डेलाची खासियत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डिझाईन संवेदनांनी सजलेल्या एक्स्पेरिएन्शियल जागा यांचा समावेश असेल. या टाऊनशिपची आधुनिक ऑरगॅनिक आणि ब्रिटिश कलोनियल आर्किटेक्चरल आणि डिझाईन शैली अनुभवात्मक जगणे, स्थिर परतावा आणि दीर्घकालीन संपत्ती वृद्धी यांना महत्त्व देणाऱ्या घरमालकांच्या व गुंतवणूकदारांच्या नवीन पिढीच्या सौंदर्याशी संबंधित आवडीनिवडींना पुरेपूर अनुरूप आहे.
डेला रिसॉर्ट्स अँड ऍडव्हेंचरचे संस्थापक आणि अध्यक्ष तसेच या महत्त्वपूर्ण विकासामागे ज्यांची दूरदृष्टी आहे असे श्री जिमी मिस्त्री यांनी सांगितले, “ही केवळ एक टाऊनशिप नाही तर भारतामध्ये आजवर कधीही पहिले न गेलेल्या स्थावर मालमत्ता मॉडेलचा हा उदय आहे. सीडीडीएमओ दृष्टिकोनासह आम्ही स्थावर मालमत्तेला केवळ उत्पादन नव्हे तर अनुभव म्हणून निर्माण करू इच्छितो. आमची इच्छा आहे की, स्थावर मालमत्ता ही केवळ एक स्थिर संपत्ती बनून राहू नये तर, गतिशील, परतावा मिळवून देणारी गुंतवणूक बनावी. पहिल्यांदाच निवासी स्थावर मालमत्तेमध्ये उद्योगक्षेत्रातील आजवरच्यापेक्षा म्हणजे ३ टक्के पेक्षा जास्त परतावा मिळत आहे, स्थावर मालमत्ता गुंतवणुकीवर पारंपरिक अपेक्षांपेक्षा जास्त ९% पर्यंत खात्रीशीर परतावा दिला जात आहे. हे लक्झरी फ्यूचर फिट लिव्हिंग आहे, अचूकपणे डिझाईन करण्यात आले आहे आणि डिझाईन, नावीन्य व संचालनातील उत्कृष्टता याचा आधार आहे.”
