रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर याच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी पनवेल शहरच्यावतीने दिनांक १६ ते १८ मे पर्यंत पनवेलमध्ये प्रथमच ‘आंबा महोत्सव’ तसेच महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या वाढदिवानिमित्त सांस्कृतिक, मनोरंजन आदी कार्यक्रमे आयोजित करण्यात आले आहेत.
शहरातील डॉ. पटवर्धन हॉस्पिटल समोरील गुजराती शाळेच्या मैदानावर तीनही दिवस आंबा महोत्सव होणार आहे. या महोत्सवाअंतर्गत शुक्रवार दिनांक १६ मे सायंकाळी ६ वाजता महिलांसाठी ‘खेळ खेळूया साऱ्याजणी चला जिंकूया अस्सल पैठणी’, शनिवार दिनांक १७ मे रोजी सायंकाळी ०७ वाजता ‘अभंग रिपोस्ट’ तर रविवार दिनांक १८ मे ला संगीत, नृत्य, कलेचा संगम असलेला ‘वारसा संस्कृतीचा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या महोत्सवाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कार्यक्रम प्रमुख माजी नगरसेविका रुचिता लोंढे, भाजप पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव यांनी केले आहे.
