रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महाड तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. १४ मे रोजी, महाड औद्योगिक वसाहतीजवळील ईशाने कांबळे गावातील ऐश्वर्या हेअर कटिंग सलूनमध्ये एका पाच वर्षीय चिमुरड्या मुलीवर बलात्कार झाला आहे. अश्लील कृत्य करणारा आरोपी विलास पांडुरंग गुलालकर, मूळचा वरंडोली ( नाते विभाग ) येथील आहे. त्याने मुलीला खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून सलूनमध्ये बोलावून घेतले आणि त्याठिकाणी तिच्यावर अमानुष अत्याचार केला.
या घटनेनंतर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय सहिता २०२३ चे कलम ६४(२) तसेच POCSO कायदा २०१२ अंतर्गत कलम ४ (२), ५ (m), आणि ६ नुसार पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक संतोष जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. व्ही. राऊत करत आहेत. ही घटना समजताच महाड तालुका व संपूर्ण रायगड जिल्ह्यात तीव्र संताप उसळला असून, विविध सामाजिक संघटना, स्थानिक नागरिक व महिलांनी आरोपीस तात्काळ कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
