रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल ( संजय कदम ) : पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांच्या विशेष पथकाने रात्रीच्या सत्रात कोंबिंग ऑपरेशन व ऑलआऊट कारवाई राबवून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर व विविध कायदा तोडणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केली. ही कारवाई पोलीस उप आयुक्त ( परिमंडळ 2 ) प्रशांत मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पो.नि. शाकीर पटेल, व पो. उ. नि. अभंग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
➡️ कारवाईत पुढीलप्रमाणे कार्यवाही झाली:
- NDPS कायद्यानुसार अंमली पदार्थ सेवनप्रकरणी 1 आरोपीवर कारवाई
- बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी 3 आरोपींवर गुन्हे दाखल
- गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 3 जणांवर लक्ष ठेवून कारवाई
- मोटार वाहन कायदा उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई
- शिवशंभू नाका येथे नाकाबंदी दरम्यान 79 वाहनांची तपासणी, 27 वाहनांवर कारवाई
- नवनाथ नगर झोपडपट्टी व रेल्वे स्थानक परिसरात परकीय नागरिकांचा शोध व हॉटेल/लॉज तपासणी
