रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल येथे साकारलेल्या दिलीप वेंगसरकर संचलित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर, उद्योजक राजू गुप्ते, क्रिकेट प्रशिक्षक अमित जाधव, भाजपचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, प्रशांत कर्पे उपस्थित होते.
