⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : महापुरुषांचा एक जरी गुण आपण अंगीकरण केल्यास आपले जीवन सार्थकी लागेल, असे प्रतिपादन जत मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी कळंबोलीमध्ये आयोजित केलेया युवा प्रेरणा संवाद कार्यक्रमात केले तसेच 31 तारखेला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंत्ती विविध कार्यक्रमांचे आयोजन करून मोठ्या उत्साहात साजरी करा, असे सांगितले.
भारतीय जनता पक्षाकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त 21 ते 31 मे या कालावधीत सामाजिक पर्व म्हणून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांच्या माध्यमातून अहिल्यादेवींच्या समाज सुधारणेतील योगदान, प्रशासनातील पारदर्शकता, महिला सक्षमीकरणासाठीचा दृष्टिकोन आणि सांस्कृतिक वारसा यांचा नव्या पिढीला परिचय करून देण्याचा भाजपचा प्रयत्न असून त्या अनुषंगाने उत्तर रायगड जिल्हा भाजपच्यावतीने जिल्हा आणि तालुका मंडल स्तरावर विविध कर्यक्रमांचे आयोजन करून सामाजिक पर्व मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत उत्तर रायगड भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त युवा प्रेरणा संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम कळंबोली सेक्टर 1ई येथील नवीन सुधागड शाळेत आयोजीत करण्यात आला होता. युवा पिढीला अहिल्यादेवींच्या कार्याची माहिती मिळावी आणि त्यातून प्रेरणा घ्यावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, आपल्या पुढच्या पिढ्यांनी तसेच तरुणांनी महापुरुषांच्या कर्तृत्वातून आणि त्यांच्या जीवन चरित्रातून आदर्श घेऊन मार्गक्रमण करावे असे सांगतले तर भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनीही, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचे विचार समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचवण्यासाठी या मेळाचे आयोजन केला असल्याचे सांगून महापुरुषांच्या स्वाभिमानाचा इतीहास आपण आपल्या पुढच्या पिढीला सांगीतला पाहिजे असे आवाहन केले.
या मेळाव्याला जत मतदार संघाचे आमदार गोपीचंद पडळकर, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजप नेते प्रल्हाद केणी, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष विकास घरत, पनवेल मंडळ अध्यक्ष सुमित झुंजाराव, खालापूर पूर्व मंडळ अध्यक्ष सनी यादव, नावडे मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर, माजी मंडळ अध्यक्ष रवीनाथ पाटील, भाजप कामगार मोर्चाचे प्रदेश सचिव संजय भगत, जिल्हा चिटणीस संदीप म्हात्रे, बबन बारगजे, अशोक मोटे, माजी नगरसेवक बबन मुकादम, रवी भगत, माजी नगरसेविका मोनिका महानवर, प्रमिला पाटील, युवामोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमर ठाकूर, महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्ष प्रिया मुकादम, विद्या तामखडे, मनीषा निकम, सरस्वती कथारा, कळंबोली युवा मोर्चा अध्यक्ष गौरव नाईक यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने तरुण उपस्थित होते.
