⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
मुबंई प्रतिनीधी : श्री.सतिश वि.पाटील : एमआयडीसीतील पोस्ट ऑफिस तसेच पासपोर्ट ऑफिस बाजुला असलेला नाला चोकअप झाल्या मुळे मागील आठवडय़ात गुडघाभर पाणी पोस्ट तसेच पासपोर्ट ऑफिस बाहेर जमा झाले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने याचा पाठपुरावा करून स्वता जाऊन तुंबलेले पाणी पंप लावुन काढण्यात आले होते. पाणी तुंबल्याने कर्मचारी तसेच नाकरीकांचे प्रचंड हाल झाले होते. पोस्ट ऑफिस समोरील सिमेंट काँक्रिट रोड बनवण्यात आला तेव्हा नाल्या संदर्भात कोणतेही नियोजन न केल्याने आज सुस्थितीत असलेला सिमेंट काँक्रिट रोड तोडण्यात आला आहे. आणि नाल्याचे काम चालु करण्यात आले आहे. नाल्याचे काम चालु नसते झाले. तर पोस्ट ऑफिस मध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असते. जेव्हा सिमेंट रोड बनवताना नियोजन हा प्रकार असतो की नाही. गावातील मातीचे रस्ते बनवतानाही नियोजन पुर्ण बनवले जातात. अश्या चुकीच्या पद्धतीत काम केल्याने जनतेचे करोडो रूपये वाया जात आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेना चुकी च्या पद्धतीत होणार्या कांमा बद्दल सातत्य पुर्ण आवाज उठवत राहणार आहे.
– संजय चव्हाण विभाग अध्यक्ष मनसे.

