⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीचे कळंबोली मंडल अध्यक्ष तसेच पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती अमर अरुण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवार दिनांक १६ जून रोजी कळंबोलीत मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सिटी हॉस्पिटल, आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सुश्रुत हॉस्पिटल यांचा सहभाग आहे. या शिबिराचे उदघाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यासह स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
कळंबोलीतील सेक्टर ०३ मधील सिटी हॉस्पिटल येथील रुग्णालयात जनरल चेकअप, कान, नाक, घसा, डोळे व दंतरोग तपासणी, सेक्टर १६ मधील आशा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जनरल चेकअप, कान, नाक, घसा, रक्तदाब, रक्त तपासणी, तसेच गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग तपासणी, तर सुश्रुत हॉस्पिटल येथे जनरल चेकअप, कान, नाक, घसा, आणि हाडांची तपासणी आदी तपासण्या करण्याबरोबरच औषधे मोफत दिली जाणार आहेत. या उपक्रमाचा कळंबोली व परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कळंबोली भाजप मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.
