🔴 रायगड लोकधारा वृत्त :
राज्यातील ३०० पेक्षा अधिक खेळाडूंचा सहभाग; विजेत्यांना एकूण ५.५ लाखांचे रोख बक्षीस
पनवेल प्रतिनिधी : बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगड यांच्या वतीने व रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या सहकार्याने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित योनिक्स सनराईज द्वितीय महाराष्ट्र सीनियर स्टेट सिलेक्शन रामशेठ ठाकूर ट्रॉफी बॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन उलवे नोड येथील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आज (दि. ११ )मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष व कामगारनेते महेंद्र घरत, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी वाय. टी. देशमुख, महाराष्ट्र बँडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी आशिष बाजपेयी, कोर्ट ऑफिशियल कमिटीचे चेअरमन विश्वास देसवंडीकर, योनेक्स सनराईजचे बालकृष्णन चौधरी, स्पर्धेचे संयोजक व बॅडमिंटन ऑर्गनायझेशन ऑफ रायगडचे अध्यक्ष तथा पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, अनिरुद्ध पाटील, उपाध्यक्ष रविंद्र भगत, शिवकुमार करयिल, सेक्रेटरी डेव्हिड अल्वारिस, खजिनदार नरेंद्र जोशी, रेफरी विनय जोशी, नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी पराग एकांदे, अहमदनगर बॅडमिंटन असोसिएशनचे सेक्रेटरी मिलिंद कुलकर्णी, श्रीशैल मिटकरी, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे, न्हावे ग्रामपंचायत सरपंच विजेंद्र म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, विजय घरत, अनंता ठाकूर, निलेश खारकर, सी.एल. ठाकूर, अमर म्हात्रे, अंकुश ठाकूर, योगिता भगत, प्रतीक गोंधळी, श्यामनाथ पुंडे, योगेश पाटील यांच्यासह खेळाडू व बॅडमिंटन रसिक उपस्थित होते.
उद्घाटनप्रसंगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत सांगितले की, “क्रीडा ही शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक आहे. खेळाडूंनी या स्पर्धेचा उपयोग आपल्या खेळगुणांचे प्रदर्शन करण्यासाठी आणि राज्याचे नाव उज्ज्वल करण्यासाठी करावा, असे आवाहन करून सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.
स्पर्धेच्या आयोजनासाठी बॅडमिंटन संघटनेचे पदाधिकारी, प्रशिक्षक व स्वयंसेवकांनी उत्कृष्ट नियोजन केले आहे. ही स्पर्धा आजपासून १५ नोव्हेंबर या कालावधीत म्हणजेच पाच दिवस चालणार असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमधील सुमारे ३०० सर्वोत्तम खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष दुहेरी, महिला दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा गटांमध्ये सामने खेळवले जात आहेत. या स्पर्धेतील विजेते, उपविजेते आणि उपांत्य फेरीतील खेळाडूंना एकूण ४ लाख रुपयांची रोख पारितोषिके, चषक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच, रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे संस्थापक लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वतीने अंतिम फेरीतील खेळाडूंसाठी अतिरिक्त दीड लाख रुपयांचे विशेष रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना आणि समारोप समारंभ १५ नोव्हेंबर रोजी आमदार महेश बालदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या समारंभात विजेत्या खेळाडूंना बक्षिसे प्रदान करण्यात येतील. स्पर्धेला सुरुवातीपासूनच खेळाडू, पालक आणि प्रेक्षकांचा मोठा उत्साह लाभत असून, उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये उत्कृष्ट सुविधा व दर्जेदार व्यवस्थेमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव मिळत आहे.

