🔴 रायगड लोकधारा वृत्त :
बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणीत एनडीएने मिळवलेल्या भव्य विजयाचा देशभरात जल्लोष होत असताना त्याचे प्रतिबिंब पनवेलमध्येही दिसले. भाजप मध्यवर्ती कार्यालय व आमदार प्रशांत ठाकूर जनसंपर्क कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त आनंद व्यक्त केला. बिहारमधील विजयाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप आणि एनडीएच्या जयघोषांनी परिसर दुमदुमवला. कार्यालयाबाहेर मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद साजरा केला. बिहार एनडीएच्या विजयाचा उत्साह पनवेलमध्ये दिवसभर जाणवून येथे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.
