रायगड लोकधारा प्रतिनिधी : महाड/ रायगड : स्थानिक स्वराज्य संस्थेतील हा विजय म्हणजे त्यांच्या विकासात्मक राजकारणातील पहिलं ठाम पाऊल आहे. कोकणात युवा सेनेचे नेतृत्व करताना त्यांनी संघटन कौशल्य, जिद्द, मेहनत आणि लोकांशी असलेलं नातं याच्या जोरावर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. आज जनतेने त्यांच्या कामावर विश्वास ठेवत दिलेला कौल हा केवळ विजय नसून जबाबदारीची जाणीव करून देणारा आहे.
विकासचा हा विजय त्या प्रत्येक शिवसैनिकाचा, युवा सैनिकाचा आणि अथक परिश्रम घेणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे. या विजयामागे असंख्य हातांची ताकद, आशीर्वाद आणि जनतेचं अपार प्रेम आहे. मायबाप जनतेने विकासला स्वीकारलं, त्याच्यावर विश्वास दाखवला यासाठी मी सर्व मतदार बांधवांचा मनापासून ऋणी आहे.

मुलगा म्हणून त्याचा अभिमान वाटतो, पण त्याहून अधिक आनंद हा आहे की तो आता जनतेचा सेवक म्हणून काम करण्याच्या मार्गावर पुढे जात आहे. आपण दिलेल्या वचनाप्रमाणे तो सर्वसामान्यांच्या विकासासाठी, भागाच्या प्रगतीसाठी आणि लोकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पूर्ण ताकदीने कार्य करेल, याची मला खात्री आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा…!
