रायगड लोकधारा वृत्तसेवा :
ll रायगड लोकधारा प्रतिनिधी ll महाड : बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली २० मार्च १९२७ रोजी झालेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे यंदा शताब्दी वर्ष आहे. अस्पृश्यांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याचा हक्क मिळवून देत सामाजिक समतेसाठी हा लढा उभारला गेला होता. या महत्त्वपूर्ण घटनेच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून शुक्रवारी (ता. २०) महाड येथे ‘चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला होता.
महमाष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ भरत, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, उल्का महाजन, सिद्धार्थ हती अबीर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले की, “चवदार तळ्याच्या आंदोलनात बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत अनेकांचा सहभाग होता आणि त्यातून समतेचा संदेश देण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण करताना समता, बंधुता, न्याय यांची खऱ्या अथनि पायाभरणी केली, तीच परंपरा महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे नेली. त्यातूनच पुढे संविधानाची निर्मिती झाली. सर्वधर्मसमभावाच्या विचारानेच काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. चवदार तळ्याच्या पाण्याचे महत्त्व अनन्यसाधारण असून, यातून माणसाने माणसाशी कसे वागावे, हा संदेश मिळतो.”
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन म्हणाल्या, बाबासाहेब आंबेडकर हे सर्वधर्मीयांचे अनुयायी होते. आजचा काळ फार कठीण असून, सध्याचे सत्ताधीश सत्तेसाठी पोटात भूक आणि डोक्यात भीती, जातीभेद यांसारख्या तंत्रांचा अवलंब करत आहेत. खोटे बोलण्यात कुणीही त्यांचा हात धरू शकत नाही आणि ते प्रचंड भ्रटाचारी आहेत.” तुषार गांधी यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “महाडमधील ९९ वर्षांपूर्वीचा काळ अंगावर काटा आणणारा आहे. तो फक्त पाण्यासाठीचा लढा नव्हता, तर समतेचा विचार समाजात देण्याचा होता. त्यामुळे तो विचार रुजविण्याची आपली सत्रांची जबाबदारी आहे.”
यावेळी आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी आवाहन केले की, “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळात रुजविणे ही काळाची गरज आहे. त्याम्यठी आपण कटिबद्ध होऊ या, चवदार तळ्याचा शताब्दी महोत्सव पुढच्या वर्षी भरगच्च व्हायला हवा. तो यशस्वी करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे.” यावेळी समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
