रायगड लोकधारा वृत्त :
नवीमुंबई प्रतिनिधी : एका हॉटेलमध्ये तरूणीचा मृतदेह आढळल्यानं नवी मुंबई हादरली आहे. नेरूळच्या शिरवणे येथील एका हॉटेलमध्ये तरूणीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळला आहे. जास्त प्रमाणात नशा केल्यामुळे तरूणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेची माहिती मिळताच नेरूळ पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, या घटनेची पाहणी फॉरेन्सिक टीम करत आहे. नवी मुंबईच्या नेरूळमधील शिरवणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. ५ मार्चला रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये एका तरूणीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली आहे. शिरवणे येथील मिनी महल हॉटेलमध्ये ही घटना घडली असल्याची माहिती आहे. ५ मार्चला रात्रीच्या सुमारास एका तरूणासोबत तरूणी हॉटेलमध्ये गेली होती. तरूण रात्रीच्या वेळेसच घरी गेला होता. मात्र, तरूणी हॉटेलमध्येच होती. सकाळी हॉटेल कर्मचारी गेला असता, दार कुणी उघडत नव्हतं. नंतर दार तोडून पाहिल्यावर तरूणी नग्न अवस्थेत होती. तसेच तिचा मृत्यू झाला होता. तरूणीचा मृतदेह पाहताच नेरूळ पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. प्राथमिक तपासात अधिक नशा केल्यामुळे तरूणीचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. या घटनेचा अधिक तपास फॉरेन्सिक टीम करते आहे.
