रायगड लोकधारा वृत्त :
उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी दूरध्वनी वरून देसले परिवाराचे केले सांत्वन,
पनवेल प्रतिनिधी : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पनवेल येथील दिलीप देसले यांचा मृत्यू झाला, ते पत्नी उषा देसले यांच्यासोबत सहलीसाठी गेले होते. मंगळवारी दुपारी २ वाजता पहलगाममधील बैसरन येथे झालेल्या हल्ल्यात देसले ठार झाले, तर त्यांची पत्नी जखमी झाली,
पनवेल येथील त्यांच्या निवासस्थानी सांत्वन करण्यासाठी गेले 
असताना उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची सुटका करण्यासाठी आणि त्यांना मदत करण्यासाठी पोचले असल्यामुळे देसले परिवाराशी दूरध्वनी द्वारे संपर्क करून देण्यात आला, त्यावेळी शिंदे साहेबांनी दिसले परिवाराचे सांत्वन केले.
