Skip to content
March 11, 2026
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
Watch Online
  • Home
  • पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील – माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार
  • पनवेल

पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील – माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार

विजय चंद्रकांत गायकर April 28, 2025

रायगड लोकधारा वृत्त :

पनवेल प्रतिनिधी : क्रिकेटची पंढरी म्हणून ओळख असलेल्या लॉर्ड मैदानावर दिलीप वेंगसरकर यांनी धावांचे तीनदा शतक झळकवले आहे आणि अशा रत्नपारखी व्यक्तिमत्वाकडून पनवेलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्रातून क्रिकेटचे रत्न मिळतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशीष शेलार यांनी आज नवीन पनवेल येथे केले.

कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून व पाठपुराव्यातून तसेच तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख, आयुक्त मंगेश चितळे यांच्या प्रशासकीय अनुभवातून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून नवीन पनवेल येथे साकारलेल्या दिलीप वेंगसरकर संचलित आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिकेट प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नामदार आशिष शेलार यांच्या हस्ते झाले. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेल्या या केंद्रामुळे पनवेल आणि परिसरातील नवोदित क्रिकेटपटूंना दर्जेदार प्रशिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. क्रिकेट क्षेत्रात नवीन प्रतिभावान खेळाडू घडवण्यासाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार असून या केंद्राचे उद्घाटक म्हणून नामदार आशिष शेलार बोलत होते. तत्पूर्वी काश्मीरमधील पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर झालेल्या अमानुष दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

नामदार आशिष शेलार यांनी पुढे बोलताना सांगितले कि, क्रीडा क्षेत्राच्या अनुषंगाने उभारण्यात आलेल्या या दर्जेदार प्रशिक्षण केंद्राची सुविधा एक नंबरची आहे. विमानतळ आणि क्रिकेट प्रशिक्षण केंद्र यांच्यात चार किलोमीटर अंतर आहे त्यामुळे कनेक्ट फ्लाईटच्या निमित्ताने या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू सरावासाठी येतील. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त करतानाच हे प्रशिक्षण केंद्र उत्तम आहेतच त्यामुळे येथील वाढती सुविधा लक्षात घेऊन रोहित शर्मा सुद्धा सरावाला येईल असा विश्वासही व्यक्त केला. टेक्निक, टेक्नॉलॉजी, एकाग्रता आणि सातत्य टिकवणे महत्वाचे असते आणि ते या ठिकाणी होईल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी बीसीसीआय, एमसीएमध्ये काम केले आहे. एशियन क्रिकेट कौन्सिलमध्ये काम करत आहे, त्यामुळे क्रिकेट व आपले नाते अतूट असल्याचे अधोरेखित करत आजच्या या प्रशिक्षण केंद्राचे उदघाट्न होत असताना हि सुविधा खेळाडू आणि क्रिकेटप्रेमींसाठी उपलब्ध झाली आहे त्याचा खूप आनंद होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना खासदार श्रीरंग बारणे यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे. आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या रूपाने जनमाणसाला आवश्यक असलेला लोकप्रतिनिधी पुन्हा मिळाला आहे. राजकारणात दुसरी टर्म मिळाल्यावर डोक्यात बडेजावची हवा जाते पण आमदार प्रशांत ठाकूर चार वेळा आमदार होऊनही त्यांच्या डोक्यात कधीच मोठेपणाची हवा गेली नाही. तेव्हा पण आणि आजपण त्यांच्या स्वभावात कुठलाच बदल झाला नाही, असेही त्यांनी नमूद केले. दिलीप वेंगसरकर स्वतः मेहनत घेतात खेळाडूंचे मनोधैर्य वाढवतात. पुण्यामध्ये दिलीप वेंगसरकर यांच्या माध्यमातून अकादमी उभारली गेली आणि त्यातून गरीब कुटुंबातून ऋतुराज गायकवाड देशासाठी खेळत आहे, त्या अनुषंगाने या अकादमीतून चांगले खेळाडू घडतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले कि, पनवेल महानगरपालिकेची २०१६ साली स्थापना झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ४५ डेज टार्गेट संकल्पना आखली आणि यामध्येही महानगरपालिका यशस्वी ठरली. अल्पावधीतच स्वच्छता पुरस्कार, विविध विकासकामे, नागरिकांशी कनेक्ट, नाविन्यपूर्ण संकल्पना व उपक्रमे राबवत पनवेल महापालिकेने राज्यात व देशात आपल्या कार्याचा ठसा उमटविला आहे. कुस्ती, कबड्डी, क्रिकेट अशा खेळांचे संकुल उभे राहत असतानाच नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्रांची साखळी निर्माण झाली आहे असे सांगतानाच या आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महत्त्वाकांक्षी आणि अत्याधुनिक सुविधा उपलब्ध झाली आहे, असेही त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे बोलताना गावांसाठी मैदाने उपलब्ध झाली पाहिजेत यासाठी आपल्या भाषणातून या विषयावर लक्ष वेधले. ९५ गावांची जागा गावठाण सोडून बाकी जागा सिडको संपादित आहे.नागरी सुविधा कामे तसेच प्रत्येक मैदान मिळाले पाहिजे ही माझी आमदार महेश बालदी यांची मागणी राहिली आहे. त्यामुळे प्रत्येक गावाला सामाजिक कार्यासाठी व खेळांसाठी मैदान सिडकोच्या माध्यमातून मिळाले पाहिजे अशी आग्रही पुनर्मागणी यावेळी बोलताना त्यांनी आपल्या भाषणातून केली. वेंगसरकर अकादमीत अनेक प्रतिभावंत खेळाडू निर्माण झाले आहेत त्याचप्रमाणे पनवेल केंद्रातूनही दर्जेदार खेळाडू तयार होतील असे सांगताना नामदार आशिष शेलार आणि क्रिकेट यांचे अतूट नाते आहे, त्यामुळे या प्रशिक्षण केंद्रावरही त्यांचे कायम प्रेम राहणार असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

यावेळी बोलताना भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी सांगितले कि, या ठिकाणहून जाताना या मैदानात वीटभट्टी, रिक्षा ट्रक पार्किंग दिसायची. आमदार प्रशांत ठाकूर, परेश ठाकूर, गणेश देशमुख यांना भेटलो आणि या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा विषय मांडला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. पनवेल परिसरात क्रिकेट विषयी खूप प्रतिभा आहे मात्र टेनिस क्रिकेटवर जोर आहे. तो दूर करून लेदर क्रिकेटवर भर देण्यासाठी आणि येथून प्रतिभावंत खेळाडू निर्माण करण्यासाठी हि अकादमी काम करणार आहे. गावस्कर नंतर सचिन नंतर विराट आणि पुढचा कोण तर तो पनवेलमधून खेळाडू असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत युवा खेळाडूंमध्ये स्फूर्ती निर्माण केली. या ठिकाणी अनेक टूर्नामेंट सुद्धा होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच स्थानिक प्रशिक्षक घेणार असल्याचे सांगत वानखेडे स्टेडियम ज्यांनी तयार केले त्या ठेकेदाराकडून हे काम पूर्ण करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच १ मे पासून या ठिकाणी प्रशिक्षण सुरु होणार असून दोन ते अडीच हजार युवा खेळाडू येतील आणि त्यामधून ८० ते १०० खेळाडू निवडले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक गणेश देशमुख यांनी सांगितले कि, हि अकादमी पांढरा हत्ती ठरेल अशी शंका निर्माण होत होती पण ती दूर झाली आहे. नुसते रस्ते, गटारे बांधून विकास होत नाही तर शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक, कला हे पण तितकेच महत्वाचे आहे. आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सिडको कडून हा भूखंड सिडकोकडून हस्तांतरित करण्यात आले आणि या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण अकादमी उभी राहून पनवेलच्या नावलौकिकात भर टाकणारा केंद्र साकारले गेले आहे.

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी म्हंटले कि, तरुण पिढीमध्ये नवभारत घडवण्याची ऊर्जा आहे. योग्य ऊर्जा जर्मनी जपान सारखी देश निर्माण करते पण अयोग्य ऊर्जा तालिबान सारखी देश घडवते त्यामुळे योग्य ऊर्जेतून भविष्य निर्माण होते. सकारात्मक ऊर्जा घेत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे आतंरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट प्रशिक्षण केंद्र साकारले आहे. त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिका हद्दीतील विविध विभागात टेनिस कोर्ट, कबड्डी, कुस्ती, क्रिकेट व इतर खेळांचे क्रीडांगण उभारण्याच्या दृष्टिकोनातून पावले उचलली जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नामदार आशिष शेलार यांचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळत असते त्यामुळे विकासकामांसोबतच क्रीडा संस्कृती चांगल्या पद्धतीने जपण्यात येत आहे. आमदार प्रशांत ठाकूर पनवेलच्या विकासासाठी नेहमी दक्ष असतात तर मंगेश चितळे, गणेश देशमुख यांच्या सारखे चांगले आयुक्त लाभले म्हणून विकास झपाटयाने झाले असल्याचे परेश ठाकूर यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आयुक्त व प्रशासक मंगेश चितळे यांनी सांगितले कि, आमदार प्रशांत ठाकूर व परेश ठाकूर यांच्या संकल्पनेतून हे आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र साकारले आहे. साडेसात एकरमध्ये हे केंद्र असून यासाठी १४ कोटी ५५ लाख रुपये खर्च झाला आहे. १५० मीटर व्यासाचे क्रिकेट मैदान, पॅव्हेलियन इमारत, तसेच इतर आवश्यक सुविधा या ठिकाणी आहेत. प्रत्येक वर्षी १० ते १९ वयोगटातील १०१ विद्यार्थ्यांना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येणार असून पनवेल महानगरपालिका हद्दीतील ५० टक्के, उर्वरित जिल्ह्यासाठी २५ तर जिल्ह्याबाहेरील २५ टक्के असा कोटा प्रशिक्षणात असणार आहे. तसेच या केंद्राचे मेंटेनन्स वेंगसरकर फाऊंडेशनच्या सीएसआर मधून होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार महेश बालदी, रायगड जिल्हा क्रिकेटचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी महापौर कविता चौतमोल, सौ. वेंगसरकर, भाजपचे ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत, शिवसेनेचे उपनेते बबन पाटील, जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, उपाध्यक्ष जयंत पगडे, शिवसेनेचे प्रथमेश सोमण, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, उपायुक्त कैलास गावडे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, सीता पाटील, जगदीश गायकवाड, माजी नगरसेवक अनिल भगत, ऍड. मनोज भुजबळ, विकास घरत, माजी नगरसेविका दर्शना भोईर, सुशीला घरत, रुचिता लोंढे, वर्षा नाईक, वृषाली वाघमारे, भाजपचे नवीन पनवेल मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंझारराव, तळोजा मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, नेरे मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, आरपीआयचे शहर पअध्यक्ष प्रभाकर कांबळे, मुख्य अभियंता संजय कटेकर यांच्यासह खेळाडू आणि क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रशिक्षक, ज्येष्ठ खेळाडू, प्रतिभावंत ज्युनिअर खेळाडू यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

Post navigation

Previous जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या पनवेल येथील “दिलीप देसले” यांच्या निवासस्थानी मंत्री भरतशेठ गोगावले जाऊन देसले परिवाराचे सांत्वन करण्यात आले
Next पत्रकारिता क्षेत्रात अद्ययावत आणि तंत्रशुद्ध शिक्षण घेण्याची सुसंधी…

Related Stories

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..
  • पनवेल

पनवेल नवी मुंबई पत्रकार संघाच्या वतीने २१ गरीब आणि गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप..

March 2, 2026
‘हिंद-दी-चादर…
  • पनवेल

‘हिंद-दी-चादर…

March 1, 2026
महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…
  • पनवेल

महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन… भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे वाटप होणार…

March 1, 2026

Recent Posts

  • महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

Recent Comments

No comments to show.

Archives

  • March 2026
  • February 2026
  • January 2026
  • December 2025
  • November 2025
  • October 2025
  • September 2025
  • August 2025
  • July 2025
  • June 2025
  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • April 2023
  • March 2023

Categories

  • Uncategorized
  • अंबरनाथ
  • अलिबाग
  • अलिबाग / सोगाव
  • अलीराजपुर
  • अहमदाबाद
  • अहिल्यानगर
  • आंगणेवाडी
  • आध्यात्मिक विचार
  • आळंदी
  • इचलकरंजी
  • उत्तर प्रदेश / बांदा
  • उत्तराखंड
  • उमेद
  • उरण
  • उरण / जासई
  • उलवे / पनवेल
  • उलवे नोड – पनवेल
  • कथा व संपूर्ण माहिती :
  • करंजखोल
  • करंजाडे
  • कर्जत
  • कल्याण
  • कल्याण / डोंबिवली
  • कल्याण / डोंबिवली / नवीमुंबई
  • कल्याण / भिवंडी
  • कळंबोली
  • कळंबोली / पनवेल
  • कळवा / मुंब्रा
  • कामोठे / पनवेल
  • काश्मीर
  • केळवणे l उरण
  • कोकण
  • कोन / पनवेल
  • क्राइम
  • खारघर
  • खारघर / पनवेल
  • खारघर l पनवेल
  • खारपाडा / पेण
  • खालापूर
  • खोपोली
  • खोपोली / खालापूर
  • खोपोली / पाळीफाटा
  • गडचिरोली
  • गव्हाण : पनवेल
  • गव्हाण / पनवेल
  • गोंदिया
  • चिपले / नेरे
  • चिपळूण
  • छत्रपती संभाजी नगर
  • छत्रपती संभाजीनगर
  • जबलपूर
  • जळगाव
  • जासई -उरण
  • जेजुरी
  • झाबुआ
  • ठाणे
  • ठाणे : डोंबिवली
  • ठाणे : मुंब्रा
  • ठाणे / शहापूर
  • डोंबिवली
  • तळा
  • तळोजा / नवीमुंबई
  • तळोजा / पनवेल
  • तुळजापूर
  • दिल्ली
  • धाराशिव / परांडा
  • धुतुम / उरण
  • नवघर l उरण
  • नवी दिल्ली
  • नवी मुंबई
  • नवीमुंबई
  • नालासोपारा
  • नालासोपारा / मुंबई :
  • नाशिक – त्र्यंबकेश्वर
  • नाहूरगाव
  • निजामपूर / महाड
  • नितलस / पनवेल
  • नेरळ / कर्जत
  • न्हावे / उरण
  • न्हावेखाडी – पनवेल
  • पनवेल
  • पनवेल : करंजाडे
  • पनवेल / उरण
  • पनवेल / विचुंबे
  • पनवेल / सुकापूर
  • पालघर
  • पाली / बोणसे
  • पिंपरी – चिंचवड
  • पुणे
  • पुणे – जेजुरी
  • पुणे – स्वारगेट
  • पुणे : रांजणगाव
  • पेण
  • पेण / ठाणे
  • पोलादपूर
  • फलटण
  • बदलापूर
  • बदलापूर :
  • बागेश्वर
  • बिरवाडी l महाड
  • भांडुप
  • भांडुप l मुंबई
  • भारत
  • मध्यप्रदेश
  • महाड
  • महाराष्ट्र
  • महिला मंच
  • माटणे
  • माणगाव
  • माळशिरस
  • मीरारोड
  • मुंबई
  • मुंबई / माहीम
  • मुंबई /माटुंगा
  • मुंब्रा
  • मुरबाड
  • मुरुड
  • मुलुंड
  • मुलुंड / मुंबई
  • मोठी जुही / उरण
  • यवतमाळ
  • रत्नागिरी
  • रसायनी – मोहोपाडा
  • रामटेक / उमरी ( चिचदा )
  • रायगड
  • रायगड / पनवेल
  • राष्ट्रीय
  • रेवदंडा / अलिबाग
  • रोहा
  • रोहा / रायगड
  • लेख
  • लोणावळा
  • वलंग l महाड
  • वसई / मुंबई
  • वहाळ / पनवेल
  • वाशिम
  • विचुंबे / पनवेल
  • विंधणे / उरण
  • विंधणे l उरण
  • विन्हेरे / महाड
  • विशेष लेख
  • शिक्षण संस्थान
  • शिरढोण – पनवेल
  • शिरढोण / पनवेल
  • शिर्डी
  • शेलघर
  • शेलघर / उरण
  • शेलघर / पनवेल
  • सांगली
  • सावरोली / खालापूर
  • स्टूडेंट ग्रुप
  • स्वास्थ्य

Trending News

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार… 1

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती…. 2

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता…. 3

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न… 4

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026
न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न… 5

न्यू इंग्लिश स्कूल वलंग येथे जागतिक महिला दिन विविध उपक्रमांच्या सहाय्याने उत्साहात संपन्न…

March 10, 2026
अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव… 6

अंबरनाथ एमआयडीसीमध्ये अग्नी तांडव…

March 10, 2026
ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..! 7

ह.भ.प कृष्णा महादेव वर्तक यांच्या लग्नाचा सुवर्णमहोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..!

March 10, 2026

Connect with Us

  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn

खबरें सबसे तेज

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…
  • महाड

महाडमध्ये साहित्याचा जागर: दोन दिवसीय ‘रायगड जिल्हा ग्रंथोत्सव २०२६’ उत्साहात संपन्न होणार…

March 10, 2026
राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….
  • महाराष्ट्र

राज्यात नवीन ऑटो रिक्षा परवान्यांना स्थगिती….

March 10, 2026
भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….
  • भारत

भारत क्रिकेटमध्ये विश्व विजेता तिसरी वेळेस पटकावला विश्व कप… न्यूझीलंडला हरवून विश्वविजेता….

March 10, 2026
ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…
  • उमेद

ग्रामपंचायत वरंध येथे जागतिक महिला दिन उत्साहात संपन्न…

March 10, 2026

VISITOR COUNTER

  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राज्य
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact
  • Facebook
  • Twitter
  • Instagram
  • Youtube
  • VK
  • LinkedIn
| DarkNews by AF themes.
Organization LogoLogo Header Menu
  • होम
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • पनवेल
    • ठाणे
    • उरण
    • पेण
    • अलिबाग
    • मुरुड
    • कर्जत
    • खालापूर
    • खोपोली
    • रायगड
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • रोहा
    • तळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड
  • राज्य
    • मध्यप्रदेश
    • उत्तर प्रदेश
    • उत्तराखंड
    • दिल्ली
    • पंजाब
    • राजस्थान
    • हरियाणा
    • हिमाचल
  • महिला मंच
  • आध्यात्मिक विचार
  • घूमता कैमरा
  • क्राइम
  • प्रॉपर्टी बाजार
  • स्वास्थ्य
  • Contact