रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके शुक्रवार दिनांक ०२ मे रोजी उरण विधानसभेतील विविध आदिवासी वाडयांना भेट देणार आहेत, यामध्ये रानसई, सारसईमी इर्शाळवाडी, बोरगाव आदी वाड्यांची पाहणी करणार आहेत. बागेची वाडी येथील कार्यक्रमात आदिवासी बांधवांना लोककला साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच इर्शाळवाडी पुनर्वसन येथील आदिवासी बांधवांशी ते संवाद साधणार आहेत. यावेळी त्यांच्या समवेत लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते अरुणशेठ भगत यांच्यासह विभागातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
