रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : तक्का स्मशानभूमी व विसर्जन घाट येथे पत्र्याची शेड उभारण्याची मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष व माजी नगरसेवक जयंत पगडे यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्याकडे केली आहे.
जयंत पगडे यांनी या संदर्भात निवेदन दिले असून त्यांनी निवेदनात म्हंटले की, तक्का गाव प्रभाग क्रमांक २० मध्ये गाढी नदी पात्रालगत तक्का स्मशानभूमी आहे. त्यालाच लागून पनवेल महानगरपालिके मार्फत विसर्जन घाट बांधलेला आहे. हया विसर्जन घाटाची लांबी रुंदी १०० x ५० फूट आहे. विसर्जन घाटावर गणेशोत्सवातील गणेश मूर्ती, नवरात्र उत्सवातील देवींच्या मूर्ती विसर्जन होत असतात. तसेच तक्का गाव कॉलनी परिसरातील व पनवेल शहरातील हजारो लोक हया ठिकाणी दशक्रिया विधी संपन्न करत असतात. मात्र हे विधी करत असताना हया विसर्जन घाटावर ऊन व पावसापासून सरंक्षण व्हावे म्हणून शेड उपलब्ध नसल्याने नागरीकांचे हाल होतात. व त्यांना मानसिक शारीरीक त्रास होत असतो. त्या ठिकाणी पञ्यांची मोठी मजबूत शेड उभारल्यास सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी पञ्याचे शेड त्वरित बांधण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
