रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : जे. एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या श्रीक्षेत्र पंचायतन मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा मंगळवार, १३ मे रोजी साजरा करण्यात आला. या सोहळ्यात हरिपाठ, श्रींची पालखी, मिरवणूक, दिंडी सोहळा, संगीत भजन, ह.भ.प. गणेश महाराज फुलकुंठवार यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला श्रीक्षेत्र पंचायतन मंदिर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या साऱ्या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी केले आहे.
