रायगड लोकधारा वृत्त :
महाराष्ट्र : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १३ मे रोजी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ९४.१०% इतका लागला आहे. विशेष म्हणजे यंदाही मुलींनी आघाडी घेतली असून ९६.१४% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर ९२.३१% मुले उत्तीर्ण झाली.
विभागनिहाय निकाल – कोकण विभागाचा उच्चतम निकाल
राज्यातील आठ विभागांमध्ये कोकण विभागाने सर्वाधिक ९८.८२% निकालासह प्रथम स्थान मिळवले आहे. तर नागपूर विभाग ९०.७८% निकालासह सर्वात शेवटी राहिला.
विभाग टक्केवारी
कोकण 98.82%
पुणे 96.44%
कोल्हापूर 96.12%
औरंगाबाद 94.32%
मुंबई 93.75%
अमरावती 93.44%
लातूर 92.67%
नागपूर 90.78%
परीक्षेला एकूण १६.११ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी
फेब्रुवारी २१ ते मार्च १७ दरम्यान घेण्यात आलेल्या परीक्षेसाठी राज्यभरातून १६.११ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यामध्ये ८.६ लाख मुले, ७.४७ लाख मुली आणि १९ तृतीयपंथी उमेदवारांचा समावेश होता.
गुण पडताळणी व पुनर्मूल्यांकन प्रक्रिया
अर्ज करण्याची अंतिम तारीख: २८ मे २०२५
गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येईल.
उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी छायाप्रती अनिवार्य आहे. छायाप्रती मिळाल्यानंतर ५ दिवसांच्या आत अर्ज करावा.
पुरवणी परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया
अर्ज भरण्याची सुरुवात: १५ मे २०२५ पासून
जुन-जुलै २०२५ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (SSC) पुरवणी परीक्षा होणार आहे.
अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून ऑनलाईन भरता येतील.
