⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
कांतीलाल पाटील : कर्जत, दि. २६ : पावसाळा आला की, कर्जत तालुक्यात 144 कलम लागू होते आणि पर्यटनांवर बंदी येते हे गेली कित्येक वर्ष कर्जत तालुक्यात घडत आहे… पण या विरोधात आवाज उठवणारा असा राजकीय आवाज आजपर्यंत उठत नव्हता. परिणामी, पर्यटनाला येणा-यांच्या जीवावर रोजगार उपलब्ध होईल म्हणून विचार करणा-यांच्या पोटावर टाच येत होती.परंतु आमदार महेंद्र थोरवे यांनीच आता या बंदीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने तालुक्यातील जनतेमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले आहे.
तसे पाहीले तर कर्जत तालुका हा पर्यटनाच्या दृष्टीने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. येथील बेरोजगार पावसाळ्यात रोजगार उपलब्ध करत आहेत. पावसाळी भाज्या, दुध-दुभते तर विकलेच जात आहे परंतू मुख्य व्यवसाय आता पर्यटकांसाठी जेवण त्याचबरोबर हॉटेल्स धाब्यांना भाक-या पुरवणे हा व्यवसाय होत असल्याने काही लोकांसाठी पावसाळा खुप आहे. महत्वाचा ठरत आहे… बारामाही” विकेंड ऑफ ला तर इतर दिवशीही तालुक्यात निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी कुटुंबासमवेत पर्यटक येत असतात …. पर्यटनाला साजेसे वातावरण व कलात्मक विकास घडविण्यासाठी ” कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे ” यांनी गेल्या आमदारकीच्या ” प्रथम पर्वात ” निधी आणून ” नंदनवन फुलवले असताना पावसाळी पर्यटनावर बंदी ते सहन करत नसल्याने पर्यटनावर बंदी नको, तर तुमची यंत्रणा कामाला लावून नियोजन करा, अशी भूमिका घेत रायगड जिल्हाधिकारी यांच्याकडे त्यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
संपूर्ण वर्षभरात अनेक पर्यटक कर्जत तालुक्यात सातत्याने पर्यटनासाठी येत असतात. मान्सून कालावधीत कर्जत तालुक्यामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या सुध्दा खूप मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पर्यटनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याकरिता प्रशासनाच्या वतीने नियोजनाकरिता १४४ कलम लागू करण्यात येते…. अर्थातच यामुळे पर्यटनावर बंदी येते व पर्यटनावर आधारित स्थानिक व्यवसायिकांचे नुकसान होते….
