रायगड लोकधारा वृत्त :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / कर्जत : आगरी समाजाचे ज्येष्ठ नेते व आंतरराष्ट्रीय कामगार नेता रायगड जिल्हा काँग्रेस अध्यक्ष मा. महेंद्रशेठ घरत यांना कर्जत तालुका आगरी समाज संघटना तसेच क्रांतीवीर हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक समिती फाउंडेशन, मानिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आगरी समाज भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
स्थळ : हुतात्मा हिराजी पाटील स्मारक, मानिवली ता. कर्जत, जि. रायगड.
🔹 समाजासाठी भरीव योगदान :
✔️ गोरगरिबांसाठी घरकुल उभारणीसाठी मदत
✔️ कोरोनाच्या काळात अन्नधान्य व वैद्यकीय सहाय्य
✔️ कॅन्सरग्रस्त रुग्णांना आर्थिक व सामाजिक आधार
✔️ रयत शिक्षण संस्थेला मोलाची मदत
✔️ अनेक गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य
✔️ तरुणांना रोजगार मिळावा यासाठी पुढाकार अनेक तरुणांना त्याच दिवशी नोकऱ्या उपलब्ध करून देण्याचे कार्य
🔹 कामगार चळवळ व आंतरराष्ट्रीय योगदान :
✔️ आगरी समाजातील एक अग्रगण्य कामगार नेता
✔️ आंतरराष्ट्रीय पातळीवर ITF (International Transport Federation) या संघटनेवर १६१ देशातून निवड
✔️ कामगारांच्या हक्कांसाठी सातत्यपूर्ण लढा
🔹 सामाजिक कार्य :
✔️ यमुना सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून समाजासाठी अविरत कार्य हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या निःस्वार्थ सामाजिक व रोजगाराभिमुख कार्याची पोचपावती असून नव्या पिढीसाठी तो प्रेरणादायी आदर्श ठरत आहे.
मा. महेंद्रशेठ घरत साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा !

