⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल प्रतिनिधी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती पनवेल परिसरात बुधवारी साजरी झाली. या निमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल शहरातील सावरकर चौकात स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी सावरकरांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे स्मरण केले. यावेळी भाजपचे उत्तर जिल्हा रायगड अध्यक्ष अविनाश कोळी, सरचिटणीस नितीन पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, गणेश कडू, सुनील बहिरा, दादा भोईर, माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रीती जॉर्ज, डॉक्टर सुरेखा मोहकर, सुनंदा पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव, भाजप सांस्कृतिक सेलचे अभिषेक पटवर्धन, पनवेल शहर मंडल अध्यक्ष सुमित झुंजारराव, कामोठे मंडल अध्यक्ष विकास घरत, चिटणीस प्रशांत शेट्ये, उपाध्यक्ष केदार भगत, रुपेश नागवेकर, प्रवीण मोरबाले, पत्रकार संजय कदम, ऍड. मनोज म्हात्रे, केशव स्मृती पतपेढीचे महेंद्र गोडबोले, वरिष्ठ व्यवस्थापक विनिता जोशी, सुशांत पाटणकर, तेजस वाडकर, ज्योती देशमाने, स्वाती कोळी, अंजली इनामदार, ओबीसी सेल महिला तालुका अध्यक्ष कविता पाटील, ज्योस्त्ना माळी यांच्यासह नागरिकांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले.
