⭕ रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पनवेल वैभव लबडे : जगभरामध्ये ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी साजरा केला जातो. १९७३ मध्ये पहिल्यांदा जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
पर्यावरण संरक्षणासाठी आणि संवर्धनासाठी या दिवशी वेगवेगळे पर्यावरण विषयक जागरूकता आणि कृती कार्यक्रम आयोजित केले जातात. जागतिक पर्यावरण दिवस पर्यावरण सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतात हा दिवस पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार योगेश लबडे यांनी तरुणांच्या मदतीने व ग्रामपंचायतीच्या सहकार्याने पर्यावरण दिनानिमित्त 60 वृक्षांची लागवड केली. यावेळी सरपंच जयश्री नाईक, सदस्या किर्ती लबडे, पोलीस पाटील संभाजी पाटील, हनुमान लबडे, सूर्यकांत लबडे, सामाजिक कार्यकर्ते तेजस लबडे, सुभाष नाईक आदींसह महिला मोठ्या उत्साहाने उपस्थित होत्या…


