⭕ रायगड लोकधारा वृत्तपत्र :
मुंबई प्रतिनीधी: श्री. सतिश वि. पाटील : स्थळ: शिवसेना शाखा (उद्धव बा. ठाकरे गट ) उदयश्री मार्ग, (भांडूप पुर्व) येथे दि : २जून ते ६ जून फिरता दवाखाना आयोजन टिप: वेळ: सकाळी १० : ०० ते दुपारी १ : ०० आणि दुपारी २ : ०० ते दुपारी ४:०० मर्यादित पेशन्ट फक्त संपर्क : लक्ष्मणपवार-७७३८३३२२९,काजरोळकर -८८५०३०१३४६
डिन्डीटी फाऊंडेशन १९९५ पासून जेष्ठ नागरिकांसाठी काम करत आहे. जे वृद्धांना समृद्ध संधी प्रधान करते. आम्ही त्याच्या मानसिक सामाजिक प्रश्नांचा विचार करतो. आणि त्यांच्या एकाकीपणा आणि असुरक्षिततेचा प्रश्न सोडविण्यास मदत करतो. त्याच्या जीवनात पुन्हा आंनद आणतो.
डिग्री फाउंडेशनने, रोटरीच्या सहकार्याने ठाणे शहरातील गरजू जेष्ठ नागरिकांसाठी ( वय ५५+) मोफत फिजिओथेरपी सुविधा सुरू केली आहे.
फिजिओथेरपी तुमच्या शरीराला मजबूत आणि अधिक लवचीक बनवण्यास मदत करते. जसे वय वाढत जाते तसे वृद्धांमध्ये शारीरिक बदल घडत असतात. शरीरातील हाडे ठिसूळ होतात आणि स्नायूंची झीज होत असते. शरीरातील संतुलन बिघडून तोल जाण्याची शक्यता वाढते.वय वाढल्यामुळे वृद्धामध्ये दिसून येते. त्यांना चांगले आरोग्य व अधिक कार्यक्षम सुरळीत ठेवण्यासाठी फिजिओथेरपी वरदान ठरते.
संपर्क : भारत मोकल मो.९००४९०९३२२ \ ०२२६१३८११००
डिन्गिटी फाउंडेशन बी-२०६दुसरा माळा, भायखळा सेवा उद्योग, दादोजी कोंडदेव मार्ग. भायखळा (पु) मुंबई-४०००२७
मुंबई प्रतिनीधी : श्री. सतिश वि.पाटील यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. अनेक समस्यांवर मानदुखी,संधिवात, गुडघे, टाच, कोपरा, पाठ,कंबर, खांदा दुखी अशा त्रस्त रुग्णांनी लाभ घेतला.
