रायगड लोकधारा वृत्तसेवा :
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पुजा चव्हाण : / कानपोली l सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना पनवेल तालुक्यातील कानपोली येथील बालाजी रेसिडेन्सी कॉम्प्लेक्स, बिल्डिंग १ आणि २ मधील बालाजी रेसिडेन्सी सांस्कृतिक मंडळ यांनी यंदाचा गणेशोत्सव अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने ७ दिवस साजरा करून एक आदर्श निर्माण केला आहे.

इमारतीतील रहिवाशांनी एकत्र येऊन बाप्पाची सुंदर आणि आकर्षक मूर्ती स्थापन केली होती. केवळ सजावट आणि आरास यापुरताच हा उत्सव मर्यादित न ठेवता मंडळाने ७ दिवस विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
दररोज सकाळ-संध्याकाळ आरती, भजन, लहान मुलांसाठी चित्रकला, नृत्य, गायन स्पर्धा, महिलांसाठी विशेष कार्यक्रम आणि सत्यनारायण पूजा अशा कार्यक्रमांनी संपूर्ण कॉम्प्लेक्स भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. सर्व रहिवाशांच्या सहकार्यामुळे आणि विशेषतः महिला मंडळ व युवकांच्या सक्रिय सहभागामुळे हा ७ दिवसीय उत्सव उत्तम प्रकारे पार पडला.
शेवटच्या दिवशी ढोल-ताशांच्या गजरात आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.
बालाजी रेसिडेन्सी सांस्कृतिक मंडळ १ आणि २ ने दाखवून दिले की सोसायटीचा गणपती हा केवळ उत्सव नसून एकोपा आणि एकतेचे प्रतीक आहे.
