रसायनी : रसायनी मोहोपाडा विभागातील ग्रुप ग्राम पंचायत वासांबेचे विद्यमान सदस्य व माजी सरपंच राकेश खारकर, सदस्य संतोष कृष्णा पाटील आणि ऋषीकेश खारकर यांनी उरण विधानसभेचे आमदार महेशशेठ बालदी साहेब यांच्या उपस्थितीत आज भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यावेळी उपस्थित विभाग अध्यक्ष सचिन तांडेल, मोहोपाडा शहर अध्यक्ष चेतन जाधव, जयदत्त भोईर, विनोद भोईर, केतन जाधव, किशोर भोईर आदि कार्यकर्ते उपस्थित होते.