रायगड लोकधारा वृत्त :
स्पा सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यापार चालत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना जबलपूर येथील एका स्पा सेंटरमध्ये घडत होती. याठिकाणी सॅलरीच्या बदल्यात ग्राहकांसोबत देहविक्री करण्यास भाग पाडत होते. जर तरूणीनं नकार दिला. तर, तिला नौकरीवरून काढण्याची धमकी दिली जात होती. याच त्रासाला कंटाळून एका तरूणीनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे.
तरूणीनं पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ‘नोकरीवर ठेवताना चांगला पगार मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले होते. मात्र, काही दिवसांनी मला ग्राहकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास दबाव टाकण्यात येत होता. जेव्हा मी विरोध केला, तेव्हा मला कामावरून काढण्याची धमकी दिली. तसेच माझा छळ केला’. ‘स्पा सेंटरमध्ये ग्राहकांना खुश करण्यास मला सांगितले. जर एखाद्या ग्राहकाला चांगले खुश केले तर, सॅलरीसोबत बक्षीसही दिलं जाईल, असं सांगण्यात आले होते. जेव्हा या गोष्टीला मी विरोध केला तेव्हा माझ्यावर दबाव टाकण्यात आला होता’, असं तक्रारीत तरूणीनं म्हटलं आहे. पोलिसांनी तातडीनं स्पा सेंटरवर धाड टाकली आणि संचालकांची चौकशी केली. धाड टाकल्यानंतर पोलिसांनी काहींना अटक केली. तसेच त्यांना ताकीद दिली. जर स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीर कृत्य आढळले तर कारवाई करू, असं पोलीस अधिकारी राजपाल सिंह यांनी सांगितलं.
