🔴 रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल प्रतिनिधी : पनवेल परिसरातील तरुणांच्या रोजगार, कौशल्यविकास आणि समाजकारण विषयक संधींवर सविस्तर चर्चा करण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत भाजप नेते श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल परिसरातील विविध सार्वजनिक मंडळातील सदस्य आणि परिसरातील तरुण उपस्थित होते. बैठकीचा उद्देश केवळ चर्चा नसून, तरुणांना रोजगाराच्या प्रत्यक्ष संधी उपलब्ध करून देण्याचा कृती आराखडा ठरवणे हा होता.
पनवेल परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, तळोजे औद्योगिक क्षेत्र, सिडकोचे प्रकल्प आणि जेएनपीटी विस्तार योजना अशा अनेक मोठ्या विकासकामांमुळे हजारो रोजगार निर्माण होत आहेत.
लोडर, हेल्पर, सिक्युरिटी गार्ड, सुपरवायझर, टेक्निशियन, ड्रायव्हर, ऑफिस असिस्टंट, अकाउंट असिस्टंट अशा विविध पदांसाठी मोठी मागणी आहे.
“आपल्याला बाहेर रोजगार शोधायची गरज नाही — संधी आपल्या परिसरातच आहे, फक्त तयारी हवी,” असे श्री. प्रितम म्हात्रे यांनी स्पष्ट केले.
सामाजिक जबाबदारी आणि सेवा….
श्री.प्रितम म्हात्रे यांनी सांगितले की, फक्त रोजगार नव्हे तर सेवा हीच आपली ओळख आहे. जे एम म्हात्रे चॅरिटेबल माध्यमातून पनवेल परिसरात ना-नफा ना-तोटा तत्त्वावर ॲम्बुलन्स सेवा सुरू असून, गरजू नागरिकांना मोफत सुविधा दिली जाते. तसेच मयत झालेल्या कुटुंबांना अंत्यसंस्कारापासून डेथ सर्टिफिकेटपर्यंत सर्व सहकार्य दिले जाते.
कोट : – “आपण एकत्र आलो, म्हणजे बदल नक्की घडेल. आज आम्ही फक्त चर्चा नाही, तर कृतीची दिशा ठरवण्यासाठी आलो होतो .प्रत्येक बैठक ही नवीन संधी घेऊन यावी आणि प्रत्येक तरुण हा आपल्या क्षेत्राचा अभिमान बनावा, हाच आपला हेतू आहे, दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या आणि नोकरीची गरज असलेल्या तरुणांनी थेट त्यांच्या भारतीय जनता पार्टी प्रितम जनार्दन म्हात्रे जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा, त्यांना त्यांच्या योग्यतेनुसार काम उपलब्ध करून देण्यासाठी पूर्ण सहकार्य केले जाईल.
श्री. प्रितम जनार्दन म्हात्रे : मा.विरोधी पक्षनेता पनवेल महानगरपालिका
