🔴 रायगड लोकधारा वृत्त :
करंजखोल पोटसुरे आळी तसेच आदिवासी वाडी हे अनेक वर्षापासून कट्टर जगताप समर्थक होते येथील सुमारे ४०० ग्रामस्थ महिला भगिनी आणि कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला. या पक्षप्रवेश समारंभावेळी उपस्थित तालुक्यातील शिवसेना युवा सेनेचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते. महाड विधानसभा मतदारसंघात तर रोज विविध पक्षातील गावेच्या गावे शिवसेनेत दाखल होत आहेत तसेच रायगड जिल्ह्यात देखील शिवसेना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जोमाने वाढताना दिसत आहे, कारण कोट्यावधी रुपयांची शहर आणि ग्रामीण भागात शिंदे साहेबांच्या माध्यमातून विकास कामे झाली आहेत, आणि होत आहेत ,त्याच विकास कामांवर लक्ष केंद्रित करत विविध पक्षातील कार्यकर्ते शिवसेनेत रोज पक्षप्रवेश करत आहेत.
शिवसेना पक्षात होत असलेल्या रोज पक्षप्रवेशामुळे विरोधकांची दैना उडाली आहे. – मंत्री भरतशेठ गोगावले






