Oplus_131072
🔴 रायगड लोकधारा वृत्त :
प्रादेशिक ओळख, शासकीय संपर्क आणि योजनांची माहिती असलेली उमेदवार….
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ०९ मधून इच्छुक अपक्ष उमेदवार म्हणून सामाजिक कार्यकर्त्या निलीमा पाटील यांची प्रभागातील नागरिकांशी जोरदार संवाद चर्चा सुरू असून त्या विविध विषयावर अनेकांच्या गाठी भेटी घेत आपल्या नेतृत्वशक्तीचा विश्वास दाखवत जनतेच्या मनावर प्रभाव पाडत असल्याची चर्चा जोर धरत आहे. यानंतर प्रभाग क्रमांक ९ मधील टेंभोडे ते वळवली खराब रस्ता ,पिण्याच्या पाण्याची सोय,सांडपाणी व्यवस्था, उत्तम शिक्षण, रोजगार, जेष्ठ नागरीक व लहान मुलांच्यासाठी विरंगुळा केंद्र,आरोग्य सेवा,उद्यान,तक्रार निवारण केंद्र, महिला सक्षमीकरण व स्वावलंबी करण्याची दृढ इच्छा बाळगत ,नागरी मूलभूत सुविधांसाठी किंवा कोणत्याही सरकारी योजनेच्या कामात अडचण येऊ देणार नाही ,हक्काच्या सर्व योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी स्वतः माझी असल्याचे सांगताना नीलिमा ताई पाटील दिसत आहे. विविध सेवा ,सुविधा, योजना लाभ व अन्य सहकार्य प्रभागातील प्रत्येक पात्र व्यक्तीपर्यंत पोहोचविताना आरोग्य सुविधा मदत, शासकीय कागदपत्रं, प्रमाणपत्रं किंवा योजना अर्ज करताना कुणालाही यापुढे भटकंती करावी लागू नये, यासाठी थेट मार्गदर्शन आणि सहाय्य केंद्र उपलब्ध करणार असल्याचे हि माहिती त्या नागरिकांना देत आहे . प्रभागातील प्रादेशिक ओळख, शासकीय संपर्क आणि योजनांची माहिती असलेला उमेदवार भविष्यात मिळाल्यास प्रभागातल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळेल व कोणत्याही कार्यात नागरिकांना त्रास होणार नाही चर्चा टेंम्बोडेकर करताना दिसत आहे. संवेदनशील भावनेतून सकारात्मक हमी जनतेला दिल्याने प्रभागात मिळणारा त्यांचा प्रतिसाद पाहता नीलिमा पाटील कुटुंबियांशी जनतेचा सूर या निमित्ताने जुळत असल्याची चर्चा प्रभागात जोर धरत आहे.
