🔴 रायगड लोकधारा वृत्त :
महाड प्रतिनिधी : महाड तालुक्यातील प्रहार संघर्ष अपंग क्रांती संघटना (रजि) दिव्यांग कल्याणकारी संस्थेच्या वतीने जागतिक दिव्यांग दिवसाचा उत्सव सोहळा बुधवार, १० डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉल, चवदार तळे, महाड येथे उत्साहात पार पडणार आहे. महाड तालुक्यातील सर्व अपंग बांधव-भगिनींनी आपल्या हक्काच्या या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी तथा कॅबिनेट मंत्री मा.ना. श्री. भरतशेठ गोगावले उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय अधिकारी महाड मा. श्री. पोपट ओमासे, डिवायएसपी महाड, तहसिलदार महाड मा. श्री. महेश शितोळे, गटविकास अधिकारी प.स.म. महाड मा. श्री. उदयसिंह साळुंखे, पोलिस निरीक्षक महाड मा. श्री. रमेश तडवी, तसेच वैद्यकीय अधिकारी मा. श्री. शांतनू डोयफोडे आणि मुख्याधिकारी नगरपरिषद महाड मा. श्री. धनंजय कोळेकर हे उपस्थित राहणार आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष मा. श्री. सुनिल कविकर, महाड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष मा. श्री. गणेश जंगम, महाड उत्पाद संघाचे अध्यक्ष मा. श्री. महेश पुरोहित, चेअरमन महाड उत्पाद संघ मा. श्री. अशोक तलाठी, संस्थापिका आणि उद्योजिका मेघना पवार, रोटरी क्लब ऑफ महाडचे अध्यक्ष मा. श्री. सुधीर मांडवकर आणि निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती साधना गांधी यांची उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजन महाड तालुका कार्यकारिणीने केले असून अध्यक्ष फैज हुर्जूक, सहसचिव नितिन खेडेकर, महिला प्रमुख सुनिता निवाते, तालुका महिला अध्यक्ष आरती सुगदरे, महाड शहराध्यक्ष मोहसिन दरेखान, विभाग प्रमुख दिलीप पवार, महिला उपाध्यक्ष सबापरवीन वारोसे, शहर महिला अध्यक्ष मंजुषा साबळे, विभाग प्रमुख संतोष कालगुडे, उपाध्यक्ष कृष्णा लाड, शहर सचिव सनिल जंगम, तालुका सचिव सज्जाद देशमुख व इम्रान सावंत, संपर्क प्रमुख संजय राक्षे आणि खाडी पट्टा विभाग प्रमुख मनोज भवूड हे सर्व तयारीत गुंतले आहेत.
जागतिक दिव्यांग दिवसानिमित्त महाडमध्ये दिव्यांगांच्या प्रश्नांवर चर्चा, सन्मान आणि कल्याणकारी उपक्रम राबवले जाणार असून हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी होण्याची अपेक्षा आहे.

