🔴 रायगड लोकधारा वृत्त :
पनवेल/ प्रतिनिधी : आगामी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत पार पडली असून कामोठे प्रभाग क्रमांक १२ मध्ये अनुसूचित जाती ( पुरुष ) आरक्षण निघाल्याने विक्रांतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष राहुल बोर्डे यांनी भाजपा नेते बाळासाहेब पाटील व आमदार विक्रांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार या प्रभागातून उमेदवारी घेऊन निवडून यावे अशी मागणी कामोठेकर करीत आहेत. सामाजिक कार्यात व वृत्तपत्र / पत्रकारिता क्षेत्रात राहुल बोर्डे यांचे योगदान मोठ्या प्रमाणात आहेत तसेच राहुल बोर्डे हे पनवेल तालुक्यात तसेच कामोठे येथील प्रभाग क्रमांक १२ येथे सुपरिचित असून त्याठिकाणी नागरिकांना वर्षानुवर्षे भेडसावणाऱ्या समस्या राहुल बोर्डे यांना ज्ञात असून त्या सोडविण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. कामोठे प्रभाग क्रमांक १२ येथे रस्त्यांची दुर्दशा, पिण्याचे पाण्याची समस्या, वीज वारंवार खंडित होण्याचे प्रकार, वाढीव वीजबिल, बेकायदेशीर पार्किंग, वाहतूक कोंडीची समस्या यासारखे मूलभूत प्रश्न विक्रांतदादा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सोडवणार असून निवडून आल्यानंतर प्रभागाचा परिपूर्ण विकास करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे राहुल बोर्डे यांनी कोकणसंध्याशी बोलताना सांगितले. राहुलजी बोर्डे यांच्या कार्याचा समाजात ठसा निर्माण झाला असून तरुणांमध्ये राहुल बोर्डे यांची एक वेगळी छबी निर्माण झाली आहे त्यामुळे याचा फायदा राहुल बोर्डे यांना नक्की होईल असा विश्वास मतदार व्यक्त करीत आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये आधीच बाशिंग बांधून बसलेले इच्छुक उमेदवार हे कधी शेकापक्षात तर कधी भाजपात अशा कोलांट्याउड्या मारत असल्याने प्रभागातील नागरिकांचा देखील आता विश्वास राहिलेला नाही त्यामुळे राहुल बोर्डे हे या संधीचा नक्कीच फायदा करून जनतेच्या कामासाठी नेहमी प्रयत्नशील राहतील असेही त्यांनी यावेळी सांगितले.
