🔴 रायगड लोकधारा वृत्त :
अविनाश जाधव / कळंबोली प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील देवळी येथे येथील श्री दत्त मंदिर यांच्यावतीने श्री दत्त जन्मोत्सव सोहळा 2025 चे आयोजन केले होते. देवळी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने सकाळी दत्तगुरूंच्याच्या मूर्तीचे अभिषेक करून संपन्न झाला. श्री दत्त जन्मोत्सव 2025 मध्ये ग्रामस्थ वतीने विविध कार्यक्रम याचे आयोजन करण्यात आले होते. भजन कार्यक्रम, श्री दत्त जन्माचे किर्तन संस्कृती कार्यक्रम वरतीच प्रसाद व महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. पंचक्रोशीतील भाविक भक्ताने येथे येऊन श्री दत्त जयंती उत्सवामध्ये सहभाग घेतला आणि दत्ता समोर नतमस्तक होऊन जन्मोत्सव साजरा केला गेला. कार्यक्रम संपन्न करण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी खूप परिश्रम घेतले.
