रायगड लोकधारा वृत्तसेवा :
प्रतिनिधी / कैलास राजे घरत : पेणचा इतिहास जाणून घेत असताना घाटमाथ्यावरून येणारे मंडळी पूर्वी “पेने करणे” म्हणजेच “मुक्काम करणे” येथे मुक्काम करून नंतर प्रवासी पुढे कोंकणात किंवा पुढचा प्रवास करत असत. पेने चा अपभ्रंश होऊन पेण या नावाची निर्मिती झाली. पेण हे गणपतीच्या मूर्तींचे माहेरघर मानले जाते देश विदेशात येथील गणेश मूर्तींना प्रचंड मागणी आहे. पेण मध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत, वाडे आहेत, ते
आपला प्राचीन वारसा जपून आहेत. गोमटेश्वर मंदिर, गणपती मंदिर, हनुमान मंदिर, पाटणेश्वर स्वयंभू शिवमंदिर, वाशी गावची जगदंबा वरसुआई. त्यावेळेस अंतोरे हे प्रसिद्ध बंदर होते. या बंदरात मोठा व्यापार चालायचा. शिवाजी महाराजांच्या काळात कल्याण व अंतोरे येथे गलबते आणि मचवे निर्मिती केली जात असे. आज जेथे पेण पोलिस ठाणे आहे ती पूर्वी गढी होती.पेणची गढी म्हणून प्रसिद्ध होती.
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे हजार पायदळी सरदार, पेणच्या गढी किल्ल्यावर नामदार खानासोबत तुंबळ युद्ध सुरू असताना स्वराज्यासाठी अंगावर २७ वार झेलणारे व एकच मोठा वार काढून नामदार खानास यमसदनी पाठवणारे. या लढाईत लढताना २८ फेब्रुवारी १६६२ रोजी शौर्यवीर नरवीर सरदार वाघोजी तुपे यांना वीरमरण आले. आज शौर्यवीर नरवीर सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधी स्थळावर जाऊन विनम्र अभिवादन करून त्यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न केला आहे. आज काळाच्या ओघात बरीचशी समाधी स्थळे, वीरगळ, गढी, गडकोट विस्मृतीत जाऊन शेवटच्या घटका मोजत आहेत. आपण त्यांचे संवर्धन केले पाहिजे. जपूया इतिहासाच्या पाऊलखुणा. अखंड सेवेचे ठायी तत्पर.. शिवशंभू चरित्र इतिहास अभ्यासक पत्रकार कैलासराजे घरत निरंतर…
