रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार कैलासराजे घरत / मुंबई विभाग संपादक : पेण / पेण शहरातील मनोहर हॉल येथे 31 जानेवारी रोजी झालेल्या, आरोग्य भारती योगा ग्रुप तर्फे महिलांच्या खुल्या गटात सुर्यनमस्कार स्पर्धेत सौ.कविता सचिन गावंड हिने 201 सुर्यनमस्कार काढून प्रथम क्रमांक पटकावला. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पेण नगरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा सौ.प्रीतम ललित पाटील यांच्या हस्ते सौ.कविता सचिन गावंड, रा.दुरशेत पेण यांना रोख रक्कम ₹1001 रुपयांचे पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सौ.कविता सचिन गावंड म्हणाल्या की, माझा प्रथम क्रमांक आल्याबद्दल मला खुप छान वाटतं, माझा मुलगा पुण्यात चार्टर्ड अकाऊंट (CA) 3rd year ला आहे व मुलगी KES मध्ये 8th Standard मध्ये शिकत आहे. माझे मिस्टर जॉब करतात. तसे पाहिल तर आम्ही सर्वजण योगा करतो. मी 2022 पासून योगा वर्गाला जाते. योगा केल्याने आपल्या डोक्यातील ताणतणाव दूर होऊन मन अगदी प्रसन्न आनंदी होते. आम्हाला डॉ.अशोक भोईर सर निःशुल्क दराने मार्गदर्शन करतात. ते त्यांचा रोजचा एक तास आम्हाला शिकवण्यासाठी देतात कुठलीही फी घेत नाही. आताच्या काळात एवढा वेळ कोण कोणासाठी देत नाही. सर्वप्रथम भोईर सरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. सूर्यनमस्कार स्पर्धेसाठी जर सरांनी उस्फुर्त केले नसते तर हे शक्य झाले नसते. स्पर्धेत भाग घेतलेल्या मैत्रिणींचे अभिनंदन…
तसेच सर्वांना शुभेच्छा ! आणि आम्हाला प्रोत्साहित करणाऱ्या मैत्रिणीचे धन्यवाद. दुसरा क्रमांक पुजा उलवे. तिसरा क्रमांक सुप्रिया पाटील. चौथा क्रमांक प्रगती म्हात्रे.पाचवा क्रमांक सिंधु सोनवणे अशा प्रकारे बऱ्याच मैत्रिणींना बक्षीस मिळाले. खरोखरच सर्वांनी खुप छान प्रयत्न केला.तसेच बक्षीस वितरण समारंभासाठी आलेल्या सौ.प्रीतम ताई पाटील यांचेही मनापासून धन्यवाद..!
सौ.कविता सचिन गावंड यांना मिळालेल्या यशाबद्दल त्यांचे बंधुराजप त्रकार कैलासराजे घरत, आईसाहेब सौ.निर्मला घरत, अण्णासाहेब कमलाकर घरत, कु.ओवी घरत, सौ.मयुरी कैलास घरत, बहिण सौ.कुणाली रवींद्र पाटील, सौ.किर्ती रुपेश देसले परिवारातर्फे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
