Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्तसेवा :
शिरगाव खदान परिसरात RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मुंबई प्रतिनिधी : विरारमध्ये भरदिवसा घडलेल्या एका थरारक हत्येने संपूर्ण शहर हादरलं आहे. विरार पूर्वेतील शिरगाव खदान परिसरात RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील यांची दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावर प्राणघात घडला केला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. विरार पूर्वेच्या शिरगाव परिसरातील खदान भागात आज दुपारी दीडच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. माहितीच्या अधिकारासाठी सातत्याने लढा देणारे RTI कार्यकर्ते आत्माराम पाटील हे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यासोबत खदान परिसरात गेले होते. यावेळी आरोपी खदान मालकाने संतापाच्या भरात आत्माराम पाटील यांच्या व्हॅगनआर कारची तोडफोड केल्याचा आरोप आहे. त्यानंतर त्यांच्यावर दगडाने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आत्माराम पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. मंडळ अधिकारी गंभीर जखमी…
या हल्ल्यात मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे देखील जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच विरार पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून पंचनामा आणि पुढील तपास सुरू असून हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, याचा शोध घेतला जात आहे.
निर्घृण हत्या नेमकी कोणत्या वादातून झाली..?
भरदिवसा घडलेल्या या निर्घृण हत्येमुळे विरार परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. विरारच्या शिरगाव खदान परिसरात भरदिवसा झालेल्या या हत्येमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. RTI कार्यकर्त्याची निर्घृण हत्या नेमकी कोणत्या वादातून झाली? हे अजून स्पष्ट झाले नाही.
विरार पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन…
विरारच्या शिरगाव खदान प्रकरणातील मृत आत्माराम पाटील यांच्या कुटुंबीयांचा विरार पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केलं आहे. आगरी समाजातील सर्व पुरुष महिला विरार पोलीस ठाण्यात एकत्रित येत न्याय देण्याची मागणी केली आहे. आमच्या वडिलांना जर न्याय दिला नाही तर आम्ही मृतदेह स्वीकारणार नाही तर तो पोलीस ठाण्यात आणून ठेवू कुटुंबाची आक्रमक भूमिका घेतली आहे. तब्बल अर्ध्या तासापासू कुटुंबीयांनी विरार पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करण्यास सुरुवात केली आहे.
