रायगड लोकधारा वृत्तसेवा :

प्रतिनिधी : आदित्य वाघ : रा. जि. प. शाळा. शिवनगर : दीड महिन्यांच्या प्रदीर्घ उन्हाळी सुट्टीनंतर रविवार ( दि. १५ जून २०२६ ) पासून राज्यातील शाळा पुन्हा गजबजल्या आहेत. याच निमित्ताने मोहोपाडा केंद्रातील शिवनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ‘शाळा प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांचे स्वागत करून त्यांना मोफत पाठ्यपुस्तके व शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.
शालेय शिक्षण विभागाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा मोफत गणवेश व मोफत पाठयपुस्तक उपलब्ध करून देण्यात आल्या. यावेळी बोलताना ग्रुप ग्रामपंचायत सरपंच सन्माननीय श्रीम.उमाताई मुंढे यांनी जिल्हा परिषद शाळा हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मुख्य कणा असल्याचे सांगत पालकांनी मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी पुढे येण्याचे आवाहन केले. तर खालापूर पंचायत समिती सदस्या श्रीम.अर्चना आत्माराम भाईर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.त्यांनी देखील मुलांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगितले.
वासांबे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्रीम.उमाताई संदीप मुंढे यांच्या कडून विद्यार्थी यांना खाऊ व शेक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
पंचायत समिती सदस्या श्रीम.अर्चना आत्माराम भोईर यांच्याकडून विद्यार्थी यांना पेन वाटप करण्यात आले.
ग्रुप ग्रामपंचायत सदस्या श्रीम.वेदिका विनोद पाटील यांच्याकडून कंपासपेटी व वह्या वाटप करण्यात आले.त्या देखील Ded उत्तीर्ण आहेत.शाळेत आलेल्या मातीच्या गोळ्याला योग्य आकार देऊन सुजान नागरिक बनविण्याचे कार्य शिक्षक करत असतात.त्यांनी शाळेतील शिक्षकांचे विशेष कौतुक केले. मोहोपाडा केंद्राचे केंद्र प्रमुख श्री.किशोर परदेसी साहेब उपस्थित होते.
तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्षा श्रीम.विजया अनंत कातकरी व सदस्य तसेच अंगणवाडी सेविका मनिषा जाधव व मदतनीस मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम.अनिता कोळी मॅडम यांनी केले. शाळेचे मुख्याद्यापक श्री. राजेंद्र कोळी सर सर्वांचे आभार मानले.
