रायगड लोकधारा वृत्त / विजय गायकर
🔴 मोर्बा जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादीच्या नेत्यांसह असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश!
रायगड लोकधारा प्रतिनिधी / माणगाव : दिनांक १९ जानेवारी २०२६ : शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाने प्रेरित होऊन शिवसेनेच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्याच्या उद्देशाने आज माणगाव येथे मोर्बा जिल्हा परिषद गटातील श्री. रमेश पांडुरंग मोरे (माजी सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती, माणगाव) आणि श्री. राजू मोरे (उपसरपंच, मोर्बा ग्रामपंचायत) यांनी शेकडो कार्यकर्ते, माता-भगिनींसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशामुळे मोर्बा जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक सक्षम झाली आहे. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला मोठे बळ मिळाले आहे. यावेळी शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत उपस्थितांना मार्गदर्शन करत असताना परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी युवासेनेचे श्री. विपुल उभारे, महेंद्र भाऊ मानकर, मोर्बा ग्रामपंचायत मधील सदस्य व कार्यकर्ते, माणगाव तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, माता-भगिनी व ग्रामस्थ शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.

