Oplus_131072
रायगड लोकधारा वृत्त :
सर्व निष्ठावंत शिवसैनिकांना संस्नेह जय महाराष्ट्र
मी सौ. मनिषा नितिन ठाकूर बाळासाहेबांची एक निष्ठावंत शिवसैनिक आपणास माहीत असेलच की मी गेली बरीच वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या आपल्या पक्ष्याची निष्ठेने आणि हिमतीने सोशल मिडिया असो वा सभा असो किंवा मोर्चा असो सर्वच ठिकाणी ठामपणे बाजू मांडत आहे. गेली 50 वर्ष आमच्या घरावर भगवा फडकत आहे! माझ्या सासऱ्याचे संपूर्ण आयुष्य शिवसेनेत गेले. नवऱ्याचे देखील. चार पक्ष फिरून नव्हतो आलो.. एकच पक्ष आयुष्यभर जपला. मला लढायला आवडते आणि मी लढते पण आज खूप दुःखाने सांगायला लागते की गेल्या काही वर्षांपासून मला उरणचे मा.आमदार श्री.मनोहरशेठ भोईर साहेब यांनी शब्द दिला होता की येणाऱ्या उरण पंचायत समिती मध्ये तुला जासई मधून लढायचे आहेच शिवाव पंचायत समिती सभापती देखील तू होशील तयारी करून ठेव त्यासाठी 2022 ला धुतूम मधून सरपंच पदासाठी लढता लढता माघार घ्यायला सांगितले आणि मी वरिष्ठांचा मान ठेवून घेतली. पण आज जेव्हा पंचायत समिती निवडणूक लागली असता मी जासई किंवा नवघर मधून इच्छुक असताना सुद्धा मला तिकीट मिळणार नाही असे सांगण्यात आले. निवडणुकीसाठी महत्त्वाचे म्हणजे तुमची समाजात ओळख, तुमचे समाजासाठी योगदान काय? तुमची पक्षावरील निष्ठा, आर्थिक पाठबळ आणि तुमची योग्यता तपासली जाते हे सर्व असताना देखील, माझ्या निष्ठेचे फळ बहुतेक मला मिळाले. कुणासाठी? तर ज्या शेकाप ने 2024 आपला केसाने गळा कापला त्यांच्यासाठी . ठीक आहे, पण माझी चुकी काय,? पक्षाच्या पडत्या काळात मी ठाम उभी राहिली? सोशल मिडिया च्या मार्फत कुठलीही भीती न बाळगता पक्ष्याची बाजू मांडली.., पूर्ण इमानदारीने स्वखर्चाने निष्ठेने आपले काम करत राहिले. मुलांना सोबत घेऊन आणि माझा नवरा सुद्धा. आमच्या सारख्या कामकारणाऱ्या कार्यकर्त्याची ही अवस्था असेल तर सामान्य शिवसैनिकांचे काय? हे सर्व जर होत असेल तर कुठेतरी ठोस निर्णय घेणे योग्य आहे, त्यामुळे मी सौ मनिषा नितिन ठाकूर शिवसेना पक्ष पदाचे व माझे पती श्री. नितिन लक्ष्मण ठाकूर सोशल मिडिया या पदाचे राजीनामे देत आहोत. आपण सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी जो मान सन्मान दिले, प्रेम दिले त्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहोत, असच प्रेम आम्हावर राहील अशी आशा करते.
जय महाराष्ट्र आपली सौ. मनिषा नितिन ठाकूर
