रायगड लोकधारा वृत्त / विजय गायकर
उरण, खालापूर येथे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महेंद्रशेठ घरत जातीने हजर
रायगड लोकधारा प्रतिनिधी / उलवे, ता. २० : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या रणधुमाळीत आंतरराष्ट्रीय कामगार नेते व काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे कार्यकर्ते आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मंगळवारी सकाळी जासई येथे हुतात्मे तसेच लोकनेते दि. बा. पाटील यांना महेंद्रशेठ घरत व महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अभिवादन केले.
त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रयाण करण्यात आले.
🔹 खालापूर तालुक्यातील रिस गणातून पंचायत समिती उमेदवार निखिल ढवळे,
🔹 जासई जिल्हा परिषद मतदारसंघाचे उमेदवार डॉ. मनीष पाटील,
🔹 चिरनेर येथून अॅड. अविनाश ठाकूर यांचे उमेदवारी अर्ज दाखल करताना महेंद्रशेठ घरत जातीने उपस्थित होते. यावेळी बोलताना महेंद्रशेठ घरत म्हणाले, “महाविकास आघाडीचे उमेदवार बहुमतांनी निवडून येतील. आजही दिबांचे नाव विमानतळाला दिलेले नाही, जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांना साडेबारा टक्के विकसित भूखंड मिळालेले नाहीत, यामुळे जनतेमध्ये प्रचंड रोष आहे. उरण नगरपरिषद निवडणुकीत जसा चमत्कार झाला, तसाच चमत्कार जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही होईल. कार्यकर्त्यांनी प्रचाराचे काम प्रामाणिकपणे करावे, मी आपल्या मागे खंबीरपणे उभा आहे.” या प्रसंगी मुरलीधर ठाकूर, अंगद ठाकूर, आनंद ठाकूर यांच्यासह काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना बळ देणारे नेतृत्व महेंद्रशेठ घरत

