रायगड लोकधारा वृत्त / विजय गायकर
रायगड लोकधारा प्रतिनिधी / पोलादपूर : रायगड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेत पक्षप्रवेशांची मालिका वेगाने सुरू असून, पोलादपूर तालुक्यातील कोंढवी विभागात उबाठा पक्षाला मोठा धक्का दिला आहे. 
कोंढवी विभागातील उबाठाचे विभागप्रमुख श्री. नितीन रघुनाथ मोरे आणि गोळेगणी गावचे उपसरपंच शेखर येरूणकर तसेच प्रकाश गोपाळ येरूणकर, प्रमोद भोसले, साईनाथ येरूणकर, दिपक मोरे, अन्य असंख्य कार्यकर्त्यांसह माझ्या उपस्थितीत तसेच रायगड जिल्ह्याचे शिवसेना सहसंपर्क प्रमुख माननीय चंद्रकांत कळंबे साहेब , पोलादपूर तालुका संपर्क प्रमुख किशोरभाऊ जाधव, तालुकाप्रमुख निलेश अहिरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

शिवसेनेच्या विकासाभिमुख व जन हितकारी कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत तसेच कोंढवी विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी नितीन रघुनाथ मोरे यांनी उबाठा पक्षाला रामराम ठोकत शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
या पक्ष प्रवेशामुळे कोंढवी विभागात शिवसेनेची ताकद वाढली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेला बळ मिळाले आहे.
या पक्षप्रवेशासाठी कोतवाल गणाचे पंचायत समिती उमेदवार अविनाश शिंदे, तसेच राजूशेठ रिंगे, रामशेठ साळवी,ज्ञानेश्वर मोरे, प्रभाकर पवार, प्रमोद पार्टे, नामदेव येरूनकर, दीपक सुर्वे ,प्रकाश मोरे, विनोदराव सीताराम मोरे, मंगेश मोरे, अंकुश मोरे,हे उपस्थित होते.
