रायगड लोकधारा वृत्तसेवा :
अविनाश जाधव वार्ताहर :
कळंबोली प्रतिनिधी : दुसऱ्या पंचवार्षिक योजनेसाठी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक प्रक्रिया मंगळवार, दि. 10 फेब्रुवारी 2026 रोजी पार पडणार आहे. 2016 रोजी स्थापन झालेली पनवेल महानगर पालिका. या महापालिकेसाठी दुसऱ्या पंचवार्षिक साठी महापौर उपमहापौर पदासाठी पनवेल महानगरपालिकेची विशेष सर्वसाधारण सभा क्रमांक ०1 पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी मा. डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली ११.०० वाजता पनवेल येथील “आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह” येथे आयोजित करण्यात आलीआहे.

दरम्यान आज दिनांक 6 फेब्रुवारी रोजी पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडीसाठी नामनिर्देशन प्रक्रियासाठी महापालिका सचिव नानासाहेब कामठे यांच्या कार्यालयात पूर्ण झाली असून संबंधित पदांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
उमेदवारी अर्ज दाखल केलेले महापौर पदासाठी :
1. श्री. पाटील नितीन जयाराम
2. सौ. अर्चना योगेश भोईर यांनी तर उपमहापौर पदासाठी दाखल अर्ज:
1. सौ. पाटील प्रमिला रवीनाथ.
2. सौ. लिला रतन कातकरी यांनी भरलेला आहे.
या विशेष सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम १९ नुसार महापालिकेच्या विद्यमान सदस्यांमधून महापौर व उपमहापौर पदासाठी अडीच वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यात येणार आहे.
या निवडणूक प्रक्रियेत प्रथम महापौर पदासाठीची प्रक्रिया राबविण्यात येणार असून, त्यानंतर उपमहापौर पदासाठी निवडणूक घेतली जाणार आहे. यामध्ये सुरूवातीस नामनिर्देशन पत्रांची छाननी, वैध उमेदवारांची नावे जाहीर करणे, उमेदवारी मागे घ्यावयाची असल्यास पीठासीन अधिकाऱ्यांकडे लेखी नोटीस देणे व हात वर करून मतांची नोंद घेणे या सर्व मतदान प्रक्रियेनंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
महापौरपदाच्या निवडणुकीनंतर लगेचच उपमहापौर पदासाठीची निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
पनवेल महानगरपालिका साठी आता जनतेला 10 फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर मिळणार आहे.
