रायगड लोकधारा वृत्तसेवा :
पत्रकार सुनिल जोशी : दिनांक 5 मार्च 2026 रोजी उरण तालुक्यातील शैक्षणिक सामाजिक राजकीय कला परंपरेचा वारसा लाभलेल्या विंधणे गावात. तालुक्यातील सर्वात मोठ्या शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण झालं. शिवछत्रपतींच्या पुतळ्याचा अनावरण होत असताना शंकुल नाशिक ढोल पथक कामोठे नवी मुंबई यांचं वादन फटाकांची रोषणाई तुतारी आणि नगारांनी वातावरणात जोश चैतन्य उत्साह भरून आणला. उपस्थितीने शिवगर्जना देत छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला.
वैभवशालीन गौरवशाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्याते सह्याद्रीरत्न श्री. धिरेंद्र ठाकूर पाणदिवेकर यांचं मंत्रमुग्ध करणारं छत्रपतींचा इतिहास जागृत करणारं व्याख्यान झाले.त्यामध्ये छत्रपतींचे एक नाही चार स्वराज्य छत्रपतींची चार वाघनखं इतिहासातील दुसरी पावनखिंड आणि सोळावं वर्ष छत्रपती शिवराय आणि आम्ही अशा कधीही न ऐकलेल्या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान शिवभक्तांच्या श्रोत्यांच्या अंगावर शहारे आणून गेले. दिमाखदार सोहळ्यामध्ये शिवचरित्राचा जागर नक्कीच श्रोत्यांना प्रेरणादायी ठरला. त्यांनी त्यांच्या शिवचिंतन या पुस्तकातील शिवस्तोत्र पठण करताना सर्वांनी सर्व शिवभक्तांनी हात जोडून शिवछत्रपतींना मानवंदना दिली. उरणच्या मातीतला हा शिवसोहळा संपूर्ण महाराष्ट्राला आदर्श ठरला.
फ्रेंड्स फोरेवर सेवाभावी संस्था विंधणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा उचललेलं शिवधनुष्य लीलया पेललं. कार्यक्रमासाठी कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार महेंद्रजी थोरवे साहेब. उरण तालुक्याचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर साहेब उरण नगर परिषदेच्या नगराध्यक्ष सौ भावनाताई घाणेकर तसेच शैक्षणिक सामाजिक राजकीय व्यावसायिक विधी असे विविध क्षेत्रातील पदाधिकारी अधिकारी दिग्गज मंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण आपल्या कणखर बाणेदार शैलीत साहित्यिका जेष्ठ कवियत्री सौ.रंजना संजय केणी यांनी आपल्या दर्जेदार शैलीत निवेदन करून कार्यक्रमात रंगत आणली.
